अलीकडेच नाशिक मध्ये खा. शरद पवार यांची एक मनमोकळी मुलाखत विश्वास लॉन्स येथे झाली. दुसऱ्या दिवशी साहेब जळगावला जाणार होते. आम्ही त्यांना निरोप देण्यासाठी ओझर विमानतळावर गेलो होतो. साहेब विमानात बसले आणि थोढ्याच वेळात विमानाने पश्चिम दिशेला टेक-ऑफ घेतला. कोणीतरी पटकन बोलले की अरे साहेबाना तर जळगावला जायचे होते आणि विमान तर मुबईकडे गेले. पायलट विसरले की काय? सर्वांच्याच मनात हा प्रश्न आला होता की विमान मुंबईच्या दिशेने का उडाले असेल?
आम्ही याबाबत माहिती घेतली असता असे लक्षात आले की विमान नेहमी हवेच्या विरुद्ध दिशेला उडते. प्रत्येक विमानतळावर हवेचा प्रवाह दाखवणारा झेंडा असतो. विमान नेहमी वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला टेकऑफ आणि लँडिंग करते. भारतात वारा पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतो. कधी या उलटही वाहत असतो. त्यामुळे येथील रनवे नेहमी पूर्व-पश्चिम असतात. अमेरिकेसह काही देशात चारही दिशांना तोंड करून 'रनवे' असतात. विमान हवेचा अवरोध 45 डिग्री अँगल पर्यंत ऍडजस्ट करू शकतात. त्यामुळे काही रनवे अधिकच्या चिन्हासारखे 'क्रॉस' मध्येही असतात. या रनवे ना 9-27 (पूर्व-पश्चिम) किंवा 18-36 म्हणजे (उत्तर - दक्षिण) असे नंबर दिलेले असतात. आपण विमानात बसलेलो असताना उड्डाणपूर्वी कॅप्टन रनवे नंबरची घोषणा करत असतात. हे समजण्यास अगदी सोपं आहे. हे आकडे म्हणजे डिग्री आहेत. 9 म्हणजे उत्तर दिशेपासून 90 डिग्री. उत्तर दिशेपासून घड्याळाच्या काट्याप्रमाणे मोजलेल्या अँगलला बेअरिंग किंवा अझीमुथ म्हणतात. रनवे 9 म्हणजेच विमान पूर्वेकडे उड्डाण करणार आहे. 27 म्हणजे 270 डिग्री अर्थात पूर्वेकडून पश्चिमेकडे, याचप्रमाणे 18 असेल तर 180 डिग्री म्हणजे उत्तरेकडून दक्षिणेकडे आणि 36 म्हणजे 360 डिग्री अर्थात दक्षिणेकडून उत्तर दिशेकडे विमानाचे उड्डाण होते. धावपट्टी किमान 1829 मीटर ते 5500 मीटर म्हणजे साडेपाच किलोमीटर लांबीची असते. मुंबईत 9-27 (3445 मी.) आणि 14-32 (2925 मी.)असे दोन रनवे असून ते एकमेकांना छेदणारे आहेत. भारतात दिल्लीचा रनवे सर्वात लांब (4430 मी.) आहे तर जगात क्वामडो (चीन) चा रनवे सर्वात लांब (5500 मी.)आहे. भारतापेक्षा मोठे रनवे इराक, इराण, कोंगो, आफ्रिका, झिम्बाब्वे, नमिबिया, कतार, दुबई, ब्राझील, रशिया, इथिओपिया इत्यादी देशात आहेत. प्रवासी विमानाचा उड्डाणसमयी वेग सुमारे 300 किमी प्रतितास असतो तर हवेत तोच वेग 1000 किमी प्रतितास असतो. त्यामुळे स्थूल मानाने किती हजार किमी अंतर आहे तेव्हडे तास विमान प्रवास करते. रनवेच्या शेवटी पांढऱ्या अक्षरात त्या धावपट्टीचा क्रमांक लिहिलेला असतो. काही ठिकाणी हवा एवढी जोरात वाहत असते की विमान रनवेच्या जवळ येई पर्यंत हवेच्या अनुरोधाने चक्क तिरके खाली आणले जाते आणि अगदी चाक स्पर्श करण्यापूर्वी विमानाची दिशा रनवे प्रमाणे बदलली जाते.
हवेचा प्रवाह विमानाच्या सोयीनुसार असेल तर विमान कोणत्याही दिशेने लँड करता येते. अशा वेळी विमानाचे पार्किंग हँगर जवळ पडेल, प्रवसी गेट जवळ पडेल, इतर विमानांचे टेक ऑफ किंवा लँडिंग मागोमाग त्वरित करता येतील असे विचार करून नियंत्रण केले जाते. आजच्या काळात विमानप्रवासा इतका आरामदायी प्रवास दुसरा नसेल. हवेत उडणाऱ्या या राजमहालामागे किती विज्ञान असते हे बघून आपण थक्क होतो. ज्या संशोधकांनी विमानाचा शोध लावून त्यात आतापर्यंतची प्रगती केली आहे, त्यांना सलाम करावासा वाटतो.
'उखाण्यातून' नवऱ्याचे नाव घेणे हा एक खास मराठी लोकांमधील लोकप्रिय उपचार आहे. नव्या नवरीला उखाणा घेण्यास किंवा नाव घेण्यास आग्रह केल्यानंतरचं तिचं आढेवेढे घेणे अन लाजणे इतके मोहक असते की उखाण्या पेक्षा ते 'दृश्य' च जास्त मजा देऊन जाते. अर्थात हे फक्त नव्या नवरीलाच लागू आहे असे नाही. कोणत्याही वयातील बाई असो, अगदी 80 वर्षांची का असेना, नाव' घेताना आढेवेढे अन लाजणे अगदी तसेच असते. लग्न समारंभ किंवा एखाद्या शुभ कार्यात हा ' नाव' घेण्याचा कार्यक्रम अगदी रंगत आणतो.. त्यातच मग एखादया बोल्ड बाई ने " चांदीच्या ग्लासात गुलाबी सरबत, आणि मनोहररावांशिवाय मला नाही करमत " असा रोमँटिक उखाणा घेतला तर मात्र विचारायला च नको.
शाळा कॉलेज मधली मुलगी लग्न होऊन जेव्हा ' वहिनी' होते तेव्हा त्या' चे मित्र आपोआपच ती चे 'भाऊ'जी होतात.. नाव घेण्याचा आग्रह करण्यात ते पुढे असतात. एका लग्नात तर खूप आग्रह करूनही नव्या नवरी ने एकच धोशा लावला होता, तो म्हण…
२७ ऑक्टोबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:- तुमच्यावर मंगळ आणि शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमचा आत्मविश्वास दांडगा असून दुरबला लोकांना मदत करणे आवडते. तुम्ही भावनाप्रधान आणि लहरी आहात. न्याय, त्याग आशा गोष्टींबद्दल तुम्हाला आदर आहे. तुम्ही सभ्य, सुसंस्कृत आणि मोठ्या मनाचे आहात. तुम्ही मित्रणाशी प्रामाणिक असतात. तुम्ही एक विश्वासू आणि जबाबदार नागरिक असतात. वक्तृत्व, हरहुन्नरी स्वभाव, स्वातंत्रपणा, मान सन्मान ही तुमची वैशिष्टये आहेत. तुम्ही आक्रमक, धाडसी, तडफदार, कार्यक्षम आणि लढावृ वृत्तीचे आहात. इतरांची कुरापत काढणे तुम्हाला आवडते. तुम्ही महत्त्वाकांक्षी असून स्वतःच्या विषयाची तुम्हाला पूर्ण माहिती असते. तसेच स्वकर्तृत्वाबद्दल तुम्हाला पूर्ण विश्वास असतात. स्वतःचे निर्णय तुम्ही स्वतःच घेतात. ध्येयपूर्ती झाल्याशिवाय तुम्ही थांबत नाहीत. तुमच्यामध्ये उतावळेपणा असतो. तुम्ही संभाषणचतुर असतात. जीवनात तुम्हाला अधिकार आणि मानसन्मान मिळतात. सहसा तुम्ही स्वतःची चूक कधीही मान्य करत नाहीत. तुम्हाला मैदानी खेळांची आणि शक्तिशाली व्यायामाची आवड असते. दुर्बल लोकांना वर दया...
३० ऑक्टोबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:- तुमच्यावर शुक्र आणि गुरु या ग्रहांचा प्रभाव आहे. व्यवस्थापकीय क्षेत्र आणि शैक्षणिक क्षेत्र यात तुम्ही चमकतात. तुम्ही शांत, प्रामाणिक, कृतिशील आहात मात्र मनातून अस्वस्थ असतात. तुमच्यात अभिमान आणि तपस्या आहे. धर्मादाय संस्था, अपंग संस्था यांसाठी काम करण्याची आवड असते. तुम्ही प्रेमळ असून संसार, पत्नी आणि लहान मुलांबद्दल विशेष आस्था असते. उत्साह दांडगा असून प्रवासाची आवड असते. आयुष्यात उशिराने प्रतिष्ठा लाभते. तुमच्या भोवती एकप्रकारचे वलय असून लोकांना आकर्षित केले जाते. तुमचा ओढा सुखासीन जीवनाकडे असतो. तुम्हाला आयुष्यात सहजपणे मान- सन्मान मिळतात. इतरांकरिता तुम्ही स्वार्थत्याग करतात. तुमच्या शब्दात आणि कृतीत ठामपणा असतो. वायफळ बडबड तुम्हाला आवडत नाही. तुम्ही अत्यंत महत्त्वाकांक्षी असून मान सन्मान आणि प्रतिष्ठा तुम्हाला प्रिय आहे. तुमचा आत्मविश्वास दांडगा आहे. धर्माचा तुम्ही डोळसपणे अभ्यास करतात. तुम्ही न्यायप्रेमी आणि इतरांच्या साठी कष्ट घेणारे आहात. तुम्हाला मोठ्याने बोलण्याची सवय असते. तुमच्यात रुबाबदारपणा, काटेक...
२२ ऑक्टोबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:- तुमच्यावर हर्षल आणि शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची शरीरयष्टी चांगली असून डोळे सुंदर असतात. स्वभावात अस्थिरता असते. अनेकदा तुम्ही अनाकलनीय वागतात. भिन्नलिंगी व्यक्तींपासून लाभ होतात. मित्र परिवार फारच छोटा असतो. भांडणे होतात मात्र त्याची फिकीर नसते. आयुष्याचा पूर्वार्ध कष्टप्रद असतो मात्र नंतर सुख आणि सफलता लाभते. तुमच्यात जबरदस्त इच्छाशक्ती आणि चिकाटी असते. कन्त्यही अडचणींवर तुम्ही मात करतात. प्रकृती सुदृढ आणि विकारवश असते. जीवनात अनेक उलाढाली होतात. स्मरणशक्ती चांगली असते. तुमच्या योजनांमध्ये वारंवार बदल होतात. जीवनात जे मिळवायचे ते शांतपणे मिळवतात. गाजावाजा केलेला आवडत नाही. हर्षलच्या प्रभावामुळे तुमच्या जीवनात आणि तुमच्या विचारांमध्ये अनेकदा विरोधाभास जाणवतो. जीवनात बरेच चढउतार येतात. विलक्षण घटना घडतात. तुम्ही अत्यंत उत्साही प्रगतिशील आहात. कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी तुम्ही तिला तोंड देऊ शकतात. तुम्ही बुद्धिमान, चतुर, शास्त्राची आवड असणारे आणि व्यापारी वृत्तीचे आहात. मानव जातीच्या कल्याणासाठी त...
Comments