दै सकाळ 23 सप्टेंबर 17 - बेल्ट
मंगेश पंचाक्षरी, नासिक. ( दै सकाळ :- रविवार, 24 सप्टेंबर 17)
शाहरुखचा एक सिनेमा आला होता. त्यात त्याच्या कंबरेच्या बेल्टला जे 'बक्कल' होतं, ते फेमस झालं होतं. आमच्या चिरंजीवानी लगोलग तसा 'बेल्ट' खरेदी केला होता. आपल्या आयुष्यात 'बेल्ट' हा प्रकार वेगवेगळ्या रूपाने येत रहातो. काही लोकं 'मगरी'च्या कातड्यापासून बनवलेला बेल्ट परदेशातून विकत आणतात. आणि इथे आल्यावर प्राण्यांच्या हत्ये विरोधात 'मगरी'चे अश्रू ढाळतात. कंबरपट्ट्याला सध्या जिथे आहे त्याच्यापेक्षा पुढे भोकं पाडायला लागणं हे मनाला फार यातना देणारं काम असतं. हा अनुभव आम्ही साधारणपणे दर दोन महिन्यास घेत असतो. पोलीस खात्यातील लोकांचा 'पट्टा' हे गुन्हेगारांना मारण्यासाठी हत्यार म्हणून वापरायचा असतो आणि फावल्या वेळात तो ठेवणार कुठे म्हणून मग ते तो कंबरेवर बांधून ठेवत असतात.
हल्ली अजून एक 'काळा पट्टा' लोकप्रिय झालेला आहे, तो जुडो, कराटेचा. हल्लीच्या आया आपल्या मुलांना किंवा मुलींना 'पांढरा विशिष्ट पोशाख' आणि त्यावर 'रंगीत पट्टा' अशा वेषात संध्याकाळी क्लासला घेऊन जाताना दिसतात. त्यात जर 'ब्लॅक बेल्ट' मिळवला तर ते मोठं यश समजलं जातं.
आपल्या देशात सर्वात जास्त कंटाळा जर कोणत्या बेल्ट चा येत असेल तर तो गाडीतील 'सीट बेल्ट'चा. बायकांना आणि ड्रायव्हर जमातीला तर गाडीत 'सीटबेल्ट' लावून बसणं मंजुरच नसतं. वास्तविक जगभरात 'सीटबेल्ट' लावणं हे सवयीचं आणि सक्तीचंही आहे. 'सीटबेल्ट' लावायची आठवण व्हावी म्हणून गाड्या बीप -बीप असा आवाजही करतात. यावर भारतीय ड्रायव्हर वर्गाने पाठीच्या मागून सीटबेल्ट 'त्या' बक्कल मध्ये खोचण्याची कल्पना शोधून काढली आहे. पण हे अत्यंत घातक आहे. अलीकडेच आमच्या एक मित्राला मोटर सायकल वर जाताना एका कारने 'जोरदार' धडक दिली. अचानक कार थांबल्याने त्यात शेजारी बसलेल्या बाईचे डोकं पुढील काचेवर आपटून फुटलं. सीटबेल्ट लावला असता तर तिला इजा झाली नसती. आपल्या कारला मुळात 'सीटबेल्ट दिलेला असताना, तो वापरणं सुरक्षेचं आणि सक्तीचं असताना' जर पोलिसांना त्यासाठी कारचालकाला दंड करावा लागत असेल तर यासारख दुर्दैव नाही. स्व-संरक्षणासाठी तुम्ही जुडो आणि कराटेचे ब्लॅकबेल्ट मिळवले तरी कार मध्ये बसताना जर 'सीटबेल्ट' लावत नसाल तर तुमचं रक्षण कोणी करू शकणार नाही. "भारतीय लोकं जर बायकोच्या जिभेचा पट्टा झेलू शकतात तर कारच्या सीटचा 'पट्टा' किस झाड की पत्ती आहे!"
-मंगेश पंचाक्षरी, नासिक.

Comments
Post a Comment