साम्यवाद
रशियामधील साडेतीनशे वर्षाची रोमानोव राजवट १९१७ मध्ये साम्यवादी विचारांनी उलथवून टाकली असली तरी त्यांच्यात दोन गट होते. बहूमत असंलेला बोल्शेविक आणि अल्पमत असलेला मेन्शेविक. केरेन्स्की यांनी त्झार निकोलस द्वितीय याची घराणेशाही संपवली. मात्र तेथील संसद (ड्युमा) ला राजनिष्ठांचा वेढा होता. केरेन्स्की जर्मनीत गेले आणि त्यांनी तेथे 'दनी' नावाचे मुखपत्र काढले. याआधीच साम्यवाद्यांनी पत्रकबाजी करून, वृत्तपत्र काढून आणि भूमिगत चळवळी उभ्या करून राजा विरोधी वातावरण तापवले होते. 'लेना' या नदीच्या नावावरून लेनिन असे टोपण नाव धरण केलेल्या नेत्याने केरेन्स्कीच्या मर्जीने रशियात सत्ता स्थापन केली. लेनिन स्वतः 'इस्क्रा' म्हणजे ठिणगी या नावाचे मुखपत्र चालवत असत. त्यांच्या 'एप्रिल थिसीस' या लेखाने जनतेला दिलासा मिळाला आणि क्रांतीचा मार्ग सुकर झाला. पुढे केरेन्स्की यांचेशी लेनिन यांचे मतभेद झाले. मार्क्सच्या विचारांची कम्युनिष्ट राजवट रशियात लागू झाली. लेनिन हा रशियाचा भाग्यविधाता ठरू लागला. रशियाचा राष्ट्रपिताच जणू. लेनिन चा इतका उदो उदो झाला की त्याचे भव्य पुतळे उभारण्यात आले. (पुढे ते पुतळे क्रेन लावून पाडण्यात आले आणि जनतेने त्यांना जोडे मारले). थोड्याच काळात जनतेचा भ्रम निरास होऊ लागला. त्झार ने सुरु केलेले युद्ध थांबवले तर गेले नाहीच, उलट त्यात वाढ झाली. जनतेची खाण्या पिण्याची मारामार झाली. पत्रकबाजी, हेरगिरी याला उत आला. विरोधकांची मुस्कटदाबी सुरु झाली. साम्यवादी विचारांचेच असलेले बोल्शेविक आणि मेन्शेविक वेगळे झाले. त्याच्यात संघर्ष पेटला. लेनिनच्या मर्जीतला स्टालिन पुढे रशियाचा सर्वसत्ताधीश झाला. रशियाचे 'प्रावदा' हे महत्वाचे वृत्तपत्र ताब्यात घेण्यात आले. त्यावर फक्त सरकारच्या बाजूने लिहिण्याची बंधने आली. लोकशाही आणि भांडवल शाही हे नंबर एकचे शत्रू समजले गेले. कम्युनिझम ला मुलामा देण्यासाठी उक्रेन मधून धान्याची निर्यात चालूच ठेवण्यात आली. याकाळात ४३ टक्के लोक भुकेने व्याकूळ झाले. सुमारे साडेतीन कोटी लोकांचा यात बळी गेला. अजूनही अनेक बेनामी कबरी तेथे सापडत आहेत. यानंतर रशियात स्थयिक झालेल्या दीड कोटी परदेशी नागरिकांना वेचून ठार मारण्यात आले. त्याचा सर्वात जास्त फटका पोलंडच्या जनतेला बसला.वंश शुद्धीवरून पाच लाख ज्यू ठार मारणाऱ्या हिटलरचा खलनायक म्हणून गवगवा झाला असला तरी एकट्या रशियात सैबेरियात पाठवलेल्या , भूकबळी आणि कुपोषण याचे बळी ठरलेल्या आणि NKVD या गुप्तचर संस्थेने आणि OGPU या पोलिसांनी ठार मारलेल्या लोकाची संख्या पाच कोटीच्या पुढे असावी आणि ती कितीही मोठी असू शकते. चीन मध्ये मावो ने वीस कोटी लीकांचा असाच बळी घेतला. मात्र पोलादी आणि बंदिस्त राजवटी मुळे या बातम्या बाहेर येऊ शकल्या नाहीत. स्टालिनने शेती, बँका आणि कारखाने याचे राष्ट्रीयीकरण केले. त्यामुळे शेती आणि कारखाने ओस पडले. फक्त युद्ध संबंधित उत्पादने होऊ लागली. मात्र याबाबत बोलणार्या बुद्धिवादी लोकांना ठार मारण्यात आले. रशियावर एकपक्षीय राजवट चालू होती. भांडवल शाही असणार्या अमेरिकेसारख्या देशांशी शीतयुद्ध छेडण्यात आले. साम्यवादी (कम्युनिष्ट) विचार सरणीचा प्रसार केला जाऊ लागला. पोलंड, जॉर्जिया. झेकोस्लोवाकिया, रोमानिया आदि देशात या राजवटी लागू झाल्या. पुढे क्युबा हि त्यात सामील झाला आणि अमेरिकेचा शत्रू बनला. रशीया, चीन, उत्तर कोरिया हि साम्यवादी ठाणी बनली. एकतर मित्र बना नाहीतर शत्रू व्हा असा इशारा दिला जाऊ लागला. जर्मिनी शी अनाक्रमण करार करून त्या काळात सैन्य अधिक बलशाली करण्यात आले. NKVD या स्टालिनला मदत करणाऱ्या गुप्तहेर खात्याचा उपसंचालक 'मालेन्कोव' याने स्टालींनच्या परवानगीने थैमान घातले. पुढे हेच मालेन्कोव पार्टीचे सेक्रेटरी झाले. स्टालिनच्या नंतर काही काळ त्यांचा वरचष्मा राहिला. रशियाची सूत्रे निकिता कृस्चेव्ह यांचेकडे आली. त्यांनी NKVD मध्ये काही बदल करून KGB ची स्थापना केली. सामुदायिक शेतीचा त्यांनी केलेला प्रयोग पूर्णपणे फसला मात्र पोलादी पकड, वृत्तपत्रांवर नियंत्रण, रेड आर्मी आणि हेरखाते यांचा गैरवापर करत त्यांनी जगाला वेगळेच चित्र दाखवले. एव्हाना अंतराळ संशोधनात रशियाने प्रगती केली मात्र त्याचा मुख्य उद्देश अमेरिकेस मागे टाकणे आणि क्षेपणास्त्रे विकसित करणे हा होता. स्पुतनिक सारखा उपग्रह सोडणे आणि युरी गगरीनला अंतराळात पाठवणे या उपलब्धी या काळात झाल्या. प्रत्येक वेळी ज्याने नवीन नेतृत्व पुढे आणले त्याचा मागच्याने काटा काढला. विश्वासघात करणे. विरोधी विचार दाबणे, पत्रकबाजी करणे, प्रसिद्धी माध्यमांचा गैरवापर करणे, बुद्धीवाद्यांचे मस्तक उडवणे हा खेळ अगदी सहजपणे चालू होता. ब्रेझनेव्ह यांनी हाच खेळ पुढे चालू ठेवला. आंद्रोपोव्ह आणि चेरनेन्को यांचेनतर गोर्बाचेव्ह रशियाचे प्रमुख झाले. गोर्बाचेव्ह यांनी 'ग्लासनोस्त' आणि 'पेरेस्त्रोईका' म्हणजे शांतता आणि मोकळेपणा हि धोरणे राबवून प्रथमच रशियन जनतेला मोकळा श्वास घेऊ दिला. मार्क्सच्या धर्म हि अफूची गोळी आहे या विधानाचा लवकरच त्यांना अनुभव येऊ लागला. पण त्यास इलाज नव्हता कारण रशियन क्रांती फसलेली होती आणि लोकांमध्ये असंतोष होता. जनतेला विचारांचे, आचारांचे, भाषणाचे तसेच धर्म पाळण्याचे स्वातंत्र्य नव्हते. गोर्बाचेव्ह यांच्या धोरणा नंतर रशियात चर्चेस आणि मशिदी उभ्या राहू लागल्या. कझाकिस्तान, उझबेकिस्थान, अझरबैझान, चेचेन्या सारखे प्रांत फुटून बाहेर पडण्याची मागणी करू लागले. १९९१ मध्ये रशियाचे १५ तुकडे झाले. त्यांचीच आपसात युद्धे सुरु झाली. गोर्बोचेव्ह यांनी येल्त्सिन यांना पुढे आणले. मात्र नंतर येल्त्सिन यांनी गोर्बाचेव्ह यांना नजर कैदेत टाकले. सामान्य जनतेचे हाल मात्र चालूच होते. पुढे KGB चे माजी प्रमुख 'पुतीन' रशियाचे अध्यक्ष झाले. पुतीन हेरखात्यात असताना पूर्व जर्मनीत राहून तंत्रज्ञान चोरी करून रशियाला पुरवित असत. कारण रशिया तंत्रज्ञानात मागे पडत चालला होता. हेरगिरीचा अनुभव असल्याने पुतीन यांना सत्तेवर स्वार होणे सहज शक्य झाले. जगभरात साम्यवादी विचार सरणी राबवणे हा त्यांचा कार्यक्रम बनला. मंगोलिया आणि अफगाणिस्तान येथे सैन्य घुसवणे त्यांना चांगलेच महागात पडले. तरीही जगभरातील लोकशाही आणि भांडवलवादी देशात अशांतता पसरवणे, तंत्रज्ञान चोरणे, पत्रक बाजी करणे, वृत्तपत्रातून पैसे चारून सरकार विरोधी वातावरण तापवणे, संस्कृती आणि धर्म यावर प्रहार करणे, दहशतवादी गटाना फूस लाऊन शस्त्रे पुरवणे, सरकार आणि आर्मी मध्ये हेर घुसवून इतर देशांची सरकारे उलथवून टाकणे हे उदयोग चालूच राहिले. शांततावादी देशांना अस्वस्थ करणे, कामगार संघटना उभारून भांडवलशाही देशातील कारखाने बंद पाडणे, AK ४७ सारख्या आधुनिक रायफली (हि १९४७ मध्ये तयार करण्यात आली आणि १९५६ मध्ये ती अधिक संहारक करण्यात आली.) अशा शस्त्रांचे जगभरात वाटप करणे, सामान्य जनतेचा बुद्धिभेद करणे, विचारांचा मुकाबला विचारांनी करण्यासारख्या लोकशाही प्रथांना फाटा देऊन त्यांची सरळ हत्या करणे हेच या व्यवस्थेचे लक्षण बनून राहिले. जगात मार्क्सवादी किंवा माओ वादी विचार पसरण्यासाठी नक्षली सारख्यांना सर्व ती मदत केली जाऊ लागली. लोकशाही नांदणाऱ्या देशांचे तुकडे करण्याची जबाबदारी तेथिल तरुणांवर सोपवण्यात येऊ लागली. (झेको स्लोवकिया चे तुकडे झाले. उत्तर आणि दक्षिण कोरिया वेगळे होऊन भांडत राहिले) फुटीरवादी गटांना मदत करून, विविध वृत्तपत्रे किंवा पत्रिका चालवून, धर्मावर टीका करून, देशाच्या प्रगतीस हातभार लावणाऱ्या प्रकल्पांना विरोध करावयास स्थानिकांना उत्तेजन देऊन, तरुणाची माथी भडकवून आणि शांततावादी जगाला कायम युध्याच्या खाईत लोटून हि विचारधारा जिवंत ठेवण्याचे प्रताप आजही चालूच आहेत. याचा अनुभव भारतीय जनता आणि उत्तर कोरियाच्या उपद्व्यापवरून जग घेत आहे. धर्म न मानणारी हि नास्तिक विचारधारा प्रसंगी धर्माचाच आधार घेऊन परस्परांना भिडावत असते. युरी ब्रेझनेव्ह या KGB मधून बाहेर पडून रशियातून पळून गेलेल्या हेराने यावर बराच प्रकाश टाकला. त्याला हा प्रचंड संहार पसंत पडला नाही म्हणून तो यातून बाहेर पडला आणि त्याने काही गुपिते उघड केली. एक बाजूला अतिरेकी धर्मवादी आणि दुसऱ्या बाजूला धर्म न मानणारे पण उत्तर कोरिया सारखे माथेफिरू यांनी जग विनाशाच्या उंबरठ्यावर आणून ठेवलं आहे.
- मंगेश पंचाक्षरी, नासिक
- मंगेश पंचाक्षरी, नासिक
Comments
Post a Comment