पेट्रोल पंप
आमच्या 'सौ' स्कुटर फिरव फिरव फिरवतात आणि पेट्रोल संपलं की "चला ना कुठं तरी आपण दोघेच, छान स्कुटर वर फिरून येऊ" असं लाडीकपणे म्हणतात. आम्हीही खुश होऊन निघतो आणि मग त्या हळूच म्हणतात "आधी पेट्रोल भरून घेऊ". आमच्या 'भोळ्या' स्वभावामुळे आम्ही नेहमीच या प्रेमळ आग्रहाला बळी पडत आलेलो आहोत. मला दुपारच्या जेवणास उशीर झाल्यास सौ फोन करते "अहो, किती उशीर? आधी जेवण करा आणि मग तुमची कामं करा बघू!" आम्हाला सौ चं हे काळजी घेणं 'जाम' आवडायचं हो. पण नंतर समजलं की 'भांडेवाली' अडीच वाजता येते आणि त्याच्या आत आम्ही जेवलो नाही तर सौ ना स्वतः 'भांडे घासून' घ्यावे लागतात म्हणून हा आटापिटा चालायचा. त्यातून ते भाज्या वगैरे 'एका भांड्यातून दुसऱ्या भांड्यात काढून का ठेवतात' हे कोडे काही आम्हाला उलगडलेले नाही. तसेच स्कुटर मध्ये पेट्रोल भरणे काही आमच्या सौ ना जमत नसे म्हणून हा सर्व 'ड्रामा' असायचा. मग आम्ही सौ ना पेट्रोल भरणे शिकवले. दोनशे रुपये चे पेट्रोल भरून दाखवले. आमच्या सौ तशा फार हुशार आहेत. त्यांनी दोनशेचं पेट्रोल भरल्यावर 'काटा' कुठपर्यंत येतो त्यावर खूण करून ठेवलीय. आता सौ केव्हाही पेट्रोल भरायला गेल्या की दोनशे रुपये देतात आणि त्या खुणेपर्यंत 'काटा' आला नाही तर पंप वाल्याशी जाम भांडत बसतात. पेट्रोल चे भाव कमी- जास्त होऊ द्या नाहीतर गाडीतील पेट्रोल ची पातळी काहीही असू द्या, दोनशे रुपये दिले की खुणे पर्यंत काटा आलाच पाहिजे अशी त्यांची ठाम समजूत आहे. त्यामुळे बऱ्याच वेळा आमच्या सौ स्कुटर मध्ये पेट्रोल भरायला पंपाच्या आसपास गेल्या की पम्पवले 'पेट्रोल शिल्लक नाही' चा बोर्ड लावून देतात. त्यामुळे आम्हाला खरं तर पेट्रोल पंप वाल्यांबद्दल अपार सहानुभूती आहे.
पण प्रश्न असा आहे की जनतेला पंप वाल्यांबद्दल सहानभूती आहे का? जनरली स्कुटर ढकलताना माणूस उजव्या बाजूने ढकलतो. म्हणून पेट्रोल पंपावर दुचाकीची रांग डाव्या बाजूने हवी. पण पंपवाले ती हमखास उजव्या बाजूने ठेवतात. 'रिक्षावाले ' पंपावर ही आपल्या बेशिस्त पणाचे दर्शन घडवत असतात. नियम मोडून 'बाटलीत' पेट्रोल नेणारी मंडळी जवळपास सर्वच पंपांवर असतात. अहो बाटलीचे काय, खेड्यातून येताना कॅन मधून आणलेलं दूध विकल्यानंतर त्याच कॅन मधून 'डिझेल' नेणारे महाभाग आम्ही बघितलेले आहेत. पुनः त्याच कॅन मधलं दूध दुसऱ्या दिवशी विकायला तयार. हेच दूध लहान मुलं पितात. पेट्रोल पंपावर चाकात मोफत हवा भरणे, स्वछतागृह इत्यादी सुविधा सक्तीच्या आहेत पण त्या सहसा मिळत नाहीत. अर्थात पंपवाल्याना खर्चाच्या तुलनेत पुरेसं 'कमिशन' मिळत नाही हेही खरं आहे. तरीही काही पंप खरेच उत्तम सेवा देतात. आता तर काय रोजच इंधनाचे दर बदलतात. मुळात पूर्वी कच्चं तेल १२० डॉलर प्रति बॅरल असताना पेट्रोल ८४ रुपये लिटर झालं होतं. तेच कच्चं तेल ४० डॉलर झाल्यावर पेट्रोल निदान ४० रुपये लिटर च्या आसपास ग्राहकांना मिळायला हवं. इंधन स्वस्त झालं तर ट्रान्सपोर्ट स्वस्त होऊन महागाई कमी होते पण शेतकऱ्यांच्यासाठी लढणाऱ्या विरोधकांना या विषयावर आवाज उठवावा असं वाटत नाहीये. सध्या देशातील अनेक पेट्रोल पंप इलेक्ट्रॉनिक 'चिप' बसवून ग्राहकांची लूटमार करत आहेत. शिवाय की पॅड मध्ये फेरफार करूनही राजरोस पेट्रोल मारलं जातंय. हा हजारो कोटींचा घोटाळा आहे. आजपर्यंत ग्राहक किती नाडला गेलाय याचा अंदाज लागणे कठीण आहे. नोकरशाही यावर मूग गिळून गप्प आहे. भावनिक मुद्द्यांवर जनतेची दिशाभूल करत सुटलेल्या विरोधकांना 'समाजकारण' करण्याची सवयच राहिली नाहीये. सातव्या वेतन आयोगाचे वेध लागलेल्या संघटना 'भ्रष्टाचारावर' मात्र काहीच भूमिका घेत नाहीयेत. एकविसाव्या शतकातला भ्रष्टाचाराचा अफजलखान शेती आणि नागरी जीवनमानाचा विध्वंस करत मोकाट सुटला आहे. आणि तथाकथित राजे (आणि) 'वाघ' नखं कुरतडत बसले आहेत.
© मंगेश पंचाक्षरी, नासिक.
ई-मेल:- mangeshp11@gmail.com

Comments
Post a Comment