Posts

Showing posts from May, 2019
© मंगेश पंचाक्षरी, नासिक.      अनेकांना असा प्रश्न पडतो की जुळ्या लोकांची कुंडली एकसारखी असते तर मग त्यांचे भाग्य वेगळे कसे? एकाच वेळी जन्माला आलेल्या दोघांची कुंडली सारखी असताना भविष्य वेगळे कसे असते? वरवर हा प्रश्न योग्य वाटत असला तरी ज्यांचा ज्योतिष्याच्या गणिताचा अभ्यास आहे, ज्यांच्या कानावरून 'लांकोदय पळे' किंवा लाहिरी टेबल वगैरे शब्द गेले असतील, त्यांना याची उत्तरे माहिती असतात. आपल्या देशात एकच टाइम लाईन आहे. ती अलाहाबाद वरून जाते. म्हणजे अलाहाबादला जी वेळ असते ती संपूर्ण भारताची वेळ समजली जाते. यास 'इंडियन स्टॅंडर्ड टाइम' असे म्हणतात. ज्योतिषी मात्र जातकाच्या जन्माची वेळ गणिताने काढत असतात. त्यास 'स्थानिक वेळ' म्हणतात. असे गणित करण्यासाठी अर्थातच जन्माच्या ठिकाणचे 'अक्षांश आणि रेखांश' गृहीत धरले जातात. त्यानुसार स्थानिक वेळ ही इंडियन स्टँडर्ड टाइम पेक्षा वेगळी येते. म्हणजेच यात अक्षांश आणि रेखांश अत्यंत महत्वाची भूमिका बजावत असतात. आता यापुढील प्रश्न म्हणजे एकाच गावात सुद्धा अक्षांश आणि रेखांश यात सूक्ष्म फरक असतो हे आपण जीपीएस वापरताना अनुभवल...