११ नोव्हेंबर तारीख स्वभाव

११ नोव्हेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-

     तुमच्यावर चंद्र आणि मंगळ या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमचा जीवनाविषयी आणि प्रेमाविषयी भावनिक दृष्टीकोन असतो. तुम्ही नम्र आहात मात्र आत्मसन्मानाची तुम्हाला आवड आहे. स्तुतिप्रिय आहात. बारीकसबारीक गोष्टीची तुम्ही काळजी करत बसतात. गूढ विद्या आणि शास्त्र तसेच तत्वज्ञान यात तुम्हाला रस असतो. स्मरणशक्ती चांगली आहे. तुम्ही सहजपणे चांगले आणि वाईट यात फरक करू शकतात. ध्येयपूर्ती झाल्याशिवाय तुम्ही थांबत नाहीत. तुम्हाला दुर्बल लोकांबद्दल दया वाटते. तुम्ही तुमचे विचार ठामपणे मांडतात. मित्रांबद्दल तुम्हाला प्रेम असून तुम्ही त्यांच्या बाजूने लढण्यास तयार होतात. तुम्हाला लांबच्या प्रवासाची आवड आहे. तुम्ही कायदप्रेमी आहात. इतरांना तुम्ही सहज आकर्षित करू शकतात. तुमच्यामध्ये उत्साह आहे आणि तुम्हाला नवनवीन कल्पना सुचत असतात. तुमच्या कौटुंबिक जीवनात बरेच चढउतार होतात. तुमच्यापेक्षा अधिक वयाच्या व्यक्तीकडे तुम्ही आकर्षित होतात. तुम्हाला मानसन्मान यांची आवड आहे. तुम्ही इतरांच्या सूचनेप्रमाणे कृती करतात. तुमच्यामध्ये उतावळेपणा असतो. अनेकदा तुमची चूक तुमच्या लक्षात येते पण तुम्ही ती मान्य करत नाहीत. इच्छाशक्ती आणि कारारीपणा या जोरावर तुम्ही कशावरही मात करू शकतात. झटपट निर्णय घेणे तुम्हाला आवडते.
     

व्यवसाय:-  लेखन, राजकीय नेता, डॉक्टर, केमिस्ट, इंजिनिअर, द्रव पदार्थ संबंधित व्यवसाय, प्रयोगशाळा संबंधित व्यवसाय, संगीतकार, कथालेखक.

शुभ दिवस:- सोमवार, मंगळवार आणि शुक्रवार.

शुभ रंग:- किरमिजी, पांढरा आणि निळा.

शुभ रत्न:- मोती, पोवळे आणि हिरा.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)

*व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या*

*कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*

Comments

Popular posts from this blog

२७ ऑक्टोबर तारीख स्वभाव

३० ऑक्टोबर तारीख स्वभाव

२२ ऑक्टोबर तारीख स्वभाव