३० नोव्हेंबर तारीख स्वभाव
३० नोव्हेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:- तुमच्यावर मंगळ आणि गुरू या दोन ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही उदारमतवादी, अशावडी आणि नशीबवान असतात. तुमचे विचार उच्च प्रतीचे असतात. तुम्ही धार्मिक असून प्रवास आवडतो. शैक्षणिक क्षेत्र आणि व्यवस्थापन यात तुम्ही चमक दाखवतात. तुम्ही शांत आणि प्रामाणिक आहात. अडचणींचा तुम्ही खंबीरपणे मुकाबला करू शकतात. तुम्ही प्रेमळ असून तुमच्या मुलांवर तुमचे विशेष प्रेम असते. उच्च पडला जाण्याची महत्वाकांक्षा असते. उत्साह दांडगा असतो. तुमचे जीवन सुखासीन असते अन भिन्न लिंगी व्यक्तींकडे तुमचा ओढ असतो. इतरांचे किरकोळ दोष सुद्धा तुम्ही सहज काढू शकतात. तुम्हाला अधिकार आणि मान सन्मान प्राप्त होतात. इतरांकरिता तुम्ही स्वार्थत्याग करतात. तुम्ही अत्यंत महत्त्वाकांक्षी असून आयुष्यात सतत पुढे जाण्याचा विचार करत असतात. तुमच्याकडे ज्ञान आहे मात्र त्याचा अहंकार टाळला पाहिजे. तुमचा कर्मकांडावर विश्वास नसतो. तुम्ही नेहमी योग्य व्यक्तीला मदत करतात. तुम्ही न्याय प्रेमी असून तुम्हाला शुद्ध प्रेमाची आवड आहे. इतरांच्या प्रगतीसाठी तुम्ही कष्ट करतात आणि अडच...