३० नोव्हेंबर तारीख स्वभाव

३० नोव्हेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-

     तुमच्यावर मंगळ आणि गुरू या दोन ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही उदारमतवादी, अशावडी आणि नशीबवान असतात. तुमचे विचार उच्च प्रतीचे असतात. तुम्ही धार्मिक असून प्रवास आवडतो. शैक्षणिक  क्षेत्र आणि व्यवस्थापन यात तुम्ही चमक दाखवतात. तुम्ही शांत आणि प्रामाणिक आहात. अडचणींचा तुम्ही खंबीरपणे मुकाबला करू शकतात. तुम्ही प्रेमळ असून तुमच्या मुलांवर तुमचे विशेष प्रेम असते. उच्च पडला जाण्याची महत्वाकांक्षा असते. उत्साह दांडगा असतो. तुमचे जीवन सुखासीन असते अन भिन्न लिंगी व्यक्तींकडे तुमचा ओढ असतो. इतरांचे किरकोळ दोष सुद्धा तुम्ही सहज काढू शकतात. तुम्हाला अधिकार आणि मान सन्मान प्राप्त होतात. इतरांकरिता तुम्ही स्वार्थत्याग करतात. तुम्ही अत्यंत महत्त्वाकांक्षी असून आयुष्यात सतत पुढे जाण्याचा विचार करत असतात. तुमच्याकडे ज्ञान आहे मात्र त्याचा अहंकार टाळला पाहिजे. तुमचा कर्मकांडावर विश्वास नसतो. तुम्ही नेहमी योग्य व्यक्तीला मदत करतात. तुम्ही न्याय प्रेमी असून तुम्हाला शुद्ध प्रेमाची आवड आहे. इतरांच्या प्रगतीसाठी तुम्ही कष्ट करतात आणि अडचणीत असलेल्या लोकांना मदत करतात. तुम्ही उत्साही आणि क्रियाशील आहात परंतु शीघ्रकोपी आहात. इतरांवर तुम्ही वर्चस्व गाजवतात. एखाद्या मोठ्या कारखान्याचे तुम्ही उत्कृष्टपणे संचालन करू शकतात. तुमचा स्वतंत्र बाणा आहे आणि तुमची जबाबदारी तुम्ही चोख पार पाडतात. तुमच्या कामात ढवळाढवळ केलेली तुम्हाला आवडत नाही. तुम्ही स्वतःचे डोके शांत ठेवल्यास कोणतीही गोष्ट मिळवणे तुम्हाला अशक्य नाही.  तुम्ही दयावान आणि नीतिमान आहात. तुम्हाला मोठ्याने बोलण्याची सवय असते. तुमच्यामध्ये पुरेपूर आत्मविश्वास आहे. तुम्ही व्यवस्थित आणि दिमाखदार आहात. तुमच्या बोलण्यामध्ये एक प्रकारचा मोकळेपणा असतो. तुम्हाला अनेक खेळांची आवड असते. तुम्हाला उत्तम विनोद बुद्धी लाभलेली आहे. तुम्ही हट्टीपणा आणि अहंकार टाळला पाहिजे. भविष्यात घडणाऱ्या घटनांची तुम्हाला आधीच जाणीव होते. तुम्ही अतिसंवेदनशील आहात त्यामुळे तुमचे वागणे एकांती आणि गूढ असते. प्रवासाची आवड असते. तुमच्या भोवती एक प्रकारचे वलय असते. भिन्न लिंगी व्यक्तींमध्ये तुम्ही लोकप्रिय असतात. पोकळ दिमाख टाळला पाहिजे. वयाच्या ३० नंतर भाग्योदय होतो. कलेची आवड असते. घराची सजावट उत्तम प्रकारे करतात. क्लब, सिनेमा, नाटक, सहली, संगीत यांची आवड असते. वृत्ती खर्चिक असते. 

व्यवसाय:-  न्यायाधीश, सचिव, सामाजिक कार्यकर्ता, धार्मिक गुरु, शिक्षक, कारखानदार, सावकार, जाहिरात वितरक, अभिनेता, मॅनेजिंग डायरेक्टर.

शुभ दिवस:- मंगळवार, गुरुवार आणि शुक्रवार.

शुभ रंग:- अंजिरी, पिवळा आणि जांभळा.

शुभ रत्न:- पुष्कराज, अमेठीस्ट आणि लसण्या.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)

*व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या*

*कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*

Comments

Popular posts from this blog

२७ ऑक्टोबर तारीख स्वभाव

३० ऑक्टोबर तारीख स्वभाव

२२ ऑक्टोबर तारीख स्वभाव