२४ नोव्हेंबर तारीख स्वभाव

२४ नोव्हेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-

       तुमच्यावर शुक्र आणि मंगळ या ग्रहांचा प्रभाव आहे. उच्च पदस्थ व्यक्तीकडून तुम्हाला चांगली मदत मिळते. भिन्न लिंगी व्यक्तींपासून फायदा होतो. श्रीमंत व्यक्तीशी विवाह होतो.  तुम्हाला उच्च दर्जाची बुद्धिमत्ता लाभली आहे. उत्तम स्मरणशक्तीचा वरदान आहे. गूढ विद्या आवडतात मात्र काळ्या जादूकडे वळण्याची भीती असते. तो प्रांत टाळला पाहिजे. तुम्ही अत्युच्च सरकारी जागी काम करू शकतात. तुमचा स्वभाव बढाईखोर असतो. तुम्ही जन्मताच कलाकार आहात. तुमचे व्यक्तिमत्व आकर्षक आहे. तुम्ही मित्र मंडळीत लोकप्रिय असतात. तुमची स्वतंत्रपणे काम करण्याची वृत्ती आहे. तुमच्यात संघटन क्षमता आहे. तुम्हाला परंपरा आणि सामाजिक बंधने आवडत नाहीत. तुम्ही आर्थिक बाबतीत नशीबवान आहात. स्वभाव खर्चिक आहे. उच्च प्रतीचे दागिने, वाहने, सुगंधी द्रव्ये आणि सुंदर वस्तू यांसह तुम्हाला विलक्षण आकर्षण असते. स्वभाव पद्धतशीर आणि अभ्यासू आहे. तुम्ही उत्तम सल्लागार आहात. मित्रांना मदत करतात. डोके शांत ठेवून आणि अहंकार बाजूला ठेऊन काम केल्यास तुम्ही उत्तम प्रगती साधू शकतात. तुम्ही विनाकारण काळजी करून मन अस्वस्थ करून घेतात. भाषणे तसेच लेखन यात यश मिळते. इतरांसाठी तुम्हाला त्याग करावा लागतो. शक्यतो दुसऱ्यांवर टीका करणे तुम्ही टाळावे. विवाहानंतर भाग्योदय होतो. तुम्ही वरून शांत दिसत असले तरी आतून मन अस्वस्थ असते.     

व्यवसाय:-  सराफी व्यवसाय,संगीतकार, हॉटेल, केमिस्ट, सुगंधी द्रव्ये विक्री, इतिहास, खनिज द्रव्ये विक्री, रत्ने विक्री, तत्वज्ञान.

शुभ दिवस:-सोमवार, मंगळवार, शुक्रवार.

शुभ रंग:- निळा, गुलाबी. 

शुभ रत्न:- हिरा, पाचू, मोती.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)

*व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या*

*कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*

Comments

Popular posts from this blog

२७ ऑक्टोबर तारीख स्वभाव

३० ऑक्टोबर तारीख स्वभाव

२२ ऑक्टोबर तारीख स्वभाव