२७ नोव्हेंबर तारीख स्वभाव

२७ नोव्हेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-

       तुमच्यावर मंगळ ग्रहाचा प्रभाव आहे. तुमचे व्यक्तिमत्व संमिश्र आहे. काही वेळेस ते विरोधाभासी असते. तुम्ही अत्यंत भावनाप्रधान आणि लहरी आहात.तुमची वृत्ती अभ्यासू आहे. शेजाऱ्यांशी तुमचे फारसे जमत नाही. तुम्ही स्वाभिमानी आहात. तुम्ही सभ्य आणि मोठ्या मांचे आहात. मित्रांशी तुम्ही प्रामाणिक असतात. तुमच्यात जबरदस्त इच्छाशक्ती असते. तुम्ही करारी आहात आणि तुमच्यात चिकाटी असते. तुम्ही निर्भय आहात. तुम्ही अत्यंत आक्रमक, लढाऊ वृत्तीचे आहात. तुम्हाला पराभव बघावा लागत नाही. कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी त्यावर तुम्ही मात करू शकतात.तुम्ही स्पष्टवक्ते आणि परखड आहात. बोलण्यात नाजूकपणा नसतो. तुम्हाला मैदानी खेळांची आणिशक्तिशाली व्यायामाची आवड असते. तुम्ही शूर असतात आणि मित्रांना तुमचा आधार वाटतो. तुम्हाला लहान मुले, प्राणी प्रिय असतात. तुमची मनशक्ती प्रचंड असतेआणि तुम्हाला गूढ अनुभव येतात. तुम्ही भरपूर प्रवास करतात आणि त्यातून अनुभव समृद्ध होतात. तुम्ही अभ्यासू आहात. शीघ्रकोपी आहात. तुमचे विचार जगाच्या पुढे असतात. तत्वांवर तुम्ही ठाम असतात. तुम्हाला गुप्त शत्रूंची भीती असते. कोर्ट कचेरी पासून सावध राहावे. इतरांचा सल्ला तुम्हाला फारसा आवडत नाही. वडिलोपार्जित संपत्ती मिळते. वैवाहिज जीवनात समस्या निर्माण झल्यास त्याचा जीवनावर मोठा परिणाम होतो. भिन्न लिंगी व्यक्तीबद्दल आकर्षण असते. सखोल वृत्ती आणि तत्वज्ञानची आवड असते. तुम्ही न्यायी आहेत.       

व्यवसाय:-  राजकीय नेता, खेळाडू, केमिस्ट, इंजिनीअर, बांधकाम, खनिज.

शुभ दिवस:- सोमवार, मंगळावर, गुरुवार.

शुभ रंग:- पिवळा, तांबडा, पांढरा.

शुभ रत्न:- पुष्कराज, मोती, माणिक.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)

*व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या*

*कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*

Comments

Popular posts from this blog

२७ ऑक्टोबर तारीख स्वभाव

३० ऑक्टोबर तारीख स्वभाव

२२ ऑक्टोबर तारीख स्वभाव