Posts

Showing posts from August, 2017

वक्तृत्व

(कृपया पूर्वपरवानगी शिवाय ही पोस्ट मुद्रित किंवा प्रकाशित करू नये.      नुकतीच लोकमान्य टिळकांची जयंती झाली. त्यावरून मला एक जुना किस्सा आठवला. मी शाळेत असतांना या काळात म्हणजे पावसाळ्यात वक्तृत्व स्पर्धा होत असत. टिळक जयंती ला तर हमखास या स्पर्धा असत. मी मुळात अत्यंत लाजरा, बुजरा. वर्गात कधी सरांनी एखादा प्रश्न विचारला तर उत्तर येत असूनही हात वर करायला घाबरायचो. आपलं काही चुकलं तर? मुलं हसली तर? अशी भीती कायम मनात असायची. एखाद्याची फजिती झाली कि वर्गातली टवाळ मुलं त्याला समजून घेण्याऐवजी कायम चिडवायची त्यामुळे अशी मानसिकता बऱ्याच मुलांची होत असते. क्वचित सरांनी एखाद्या प्रशांसाठी उभं केलंच, तर छातीत धडधड व्हायची. इकडे घरून आईचा मात्र वक्तृत्व स्पार्धेत भाग घे असा धोशा असायचा. धोशा काय, सक्तीचं असायची. मला वक्तृत्व हा प्रकार बिलकुल आवडायचा नाही. स्पर्धेत भाग घेणं नकोस व्हायचं. बक्षीस मिळण्याचा तर प्रश्नच नव्हता. चुकून मिळालं तर ते घेण्यासाठी स्टेज वर जावं लागेल आणि नक्की काहीतरी फजिती होईल आणि मुलं हसतील हा विचार डोक्यात बसलेला होता. आईच्या आग्रहाखातर संस्कृत आणि चित...
मंगेश पंचाक्षरी रनवे -मंगेश पंचाक्षरी, नासिक. (मुक्तचिंतन)      अलीकडेच नाशिक मध्ये खा. शरद पवार यांची एक मनमोकळी मुलाखत विश्वास लॉन्स येथे झाली. दुसऱ्या दिवशी साहेब जळगावला जाणार होते. आम्ही त्यांना निरोप देण्यासाठी ओझर विमानतळावर गेलो होतो. साहेब विमानात बसले आणि थोढ्याच वेळात विमानाने पश्चिम दिशेला टेक-ऑफ घेतला. कोणीतरी पटकन बोलले की अरे साहेबाना तर जळगावला जायचे होते आणि विमान तर मुबईकडे गेले. पायलट विसरले की काय? सर्वांच्याच मनात हा प्रश्न आला होता की विमान मुंबईच्या दिशेने का उडाले असेल?      आम्ही याबाबत माहिती घेतली असता असे लक्षात आले की विमान नेहमी हवेच्या विरुद्ध दिशेला उडते. प्रत्येक विमानतळावर हवेचा प्रवाह दाखवणारा झेंडा असतो. विमान नेहमी वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला  टेकऑफ आणि लँडिंग करते. भारतात वारा पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतो. कधी या उलटही वाहत असतो. त्यामुळे येथील रनवे नेहमी पूर्व-पश्चिम असतात. अमेरिकेसह काही देशात चारही दिशांना तोंड करून 'रनवे' असतात. विमान हवेचा अवरोध ...
दै सकाळ मध्ये आलेला माझा लेख:- आम्ही लहानपणी एक शेर वाचला होता. " मैने उससे प्यार किया अबला समज कर, लेकींन उसकी बाप ने मुझे पिटा 'तबला' समझकर". असले आचरट शेर कोण लिहितं हे काही कळत नाही. पण या शेर मूळे आम्हाला 'तबल्या' बद्दल कुतूहल जागृत झालं. बरेच पालक आपल्या लहान मुलाला तबला शिकायला क्लास मध्ये घेऊन जातात. पालकांचा पहिला प्रश्न असतो "याला किती दिवसात तबला वाजवता येईल?" . यासारखा अज्ञानमूलक प्रश्न जगात दुसरा कोणताच नसेल. आधीच पालकांनी मुलाचं नाव सचिन ठेवलेलं असतं. पण शहरातील मैदानांची कमतरता, टीव्ही मुळे लहानपणीच लागलेला चष्मा, मुलाने कायम टॉपर असावे म्हणून  बालवाडीपासून लावलेल्या ट्युशन अशा कारणांनी या सचिनचा क्रिकेट शी फारसा संबंध येत नाही . आता आपला मुलगा सहा महिन्यात 'उस्ताद झाकीर हुसेन' बनावा असं बहुसंख्य पालकांना वाटायला लागतं. मग एक दोन दिवसातच शेजारच्यांनाही 'आमचा मुलगा तबला शिकतो' अशी फुशारकी मारून पालक भाव खातात. शेजारी देखील " अरे वा, उस्ताद सचिन आपल्या कॉलनीचं नाव काढणार बुवा, ख्याक...ख्याक...." असं बोलत सचिन...
-मंगेश पंचाक्षरी, नासिक.      अगदी सुरुवातीला 'मोबाईल' विकत घेताना खूप पैसे घालवल्यावर आता यावर जास्त खर्च करायचं नाही असं आम्ही ठरवलं. काही काळ आम्ही अगदी साधा मोबाईल वापरला. त्यात काही न काही प्रापंचिक खर्च वाढत असल्याने मोबाईल केवळ फोन घेणे आणि करणे इतपतच मर्यादित झाला. त्या काळात तसेही स्मार्ट फोन नव्हते. केमेरा ही नुकताच मोबाईल मध्ये समाविष्ट झाला होता. आम्ही नोकियाचं बेसिक मॉडेल वापरत होतो. आम्हाला पुत्ररत्न झाल्याने दवाखाना वगैरे बराच खर्च झाला होता. पण आमच्या प्रेमळ 'सौ' नवीन मोबाईल विकत घ्या म्हणून मागे लागल्या होत्या. आम्ही हसून टाळत होतो. एकदा आमच्या मोबाईल सारखं सेम मॉडेल सौ ने घंटागाडीवाल्याकडे पाहिलं मात्र, सौ ने आमचा मोबाईल सिमकार्ड काढून त्याच घंटागाडीत फेकून दिला. आता आमची पंचाईत झाली. मग सौ नेच बचत केलेल्या पैशातून आम्हाला एक नोकिया 6600 मोबाईल विकत घेऊन दिला. त्या काळात हा मोबाईल बराच महाग होता आणि त्या मॉडेलची सर्वात जास्त क्रेझ होती.      आमच्या एका मित्राचे त्या दरम्यान कर्नाटक मधील 'यादगीर' गावात लग्न होते. लग्नास आम्ही यावे असा ...

उखाण्यातून नाव

©मंगेश पंचाक्षरी, नासिक. आज रविवार दि 30 जुलै 2017 रोजी दै सकाळ मध्ये प्रकाशित झालेला माझा लेख      'उखाण्यातून' नवऱ्याचे नाव घेणे हा एक खास मराठी लोकांमधील लोकप्रिय उपचार आहे. नव्या नवरीला उखाणा घेण्यास किंवा नाव घेण्यास आग्रह केल्यानंतरचं तिचं आढेवेढे घेणे अन लाजणे इतके मोहक असते की उखाण्या पेक्षा ते 'दृश्य' च जास्त मजा देऊन जाते. अर्थात हे फक्त नव्या नवरीलाच लागू आहे असे नाही. कोणत्याही वयातील बाई असो, अगदी 80 वर्षांची का असेना, नाव' घेताना आढेवेढे अन लाजणे अगदी तसेच असते. लग्न समारंभ किंवा एखाद्या शुभ कार्यात हा ' नाव' घेण्याचा कार्यक्रम अगदी रंगत आणतो.. त्यातच मग एखादया बोल्ड बाई ने " चांदीच्या ग्लासात गुलाबी सरबत,  आणि मनोहररावांशिवाय मला नाही करमत " असा रोमँटिक उखाणा घेतला तर मात्र विचारायला च नको.      शाळा कॉलेज मधली मुलगी लग्न होऊन जेव्हा  ' वहिनी' होते तेव्हा त्या' चे मित्र आपोआपच ती चे 'भाऊ'जी होतात.. नाव घेण्याचा आग्रह करण्यात ते पुढे असतात. एका लग्नात तर खूप आग्रह करूनही नव्या नवरी ने एकच धोशा लावला होता, तो ...