Posts

Showing posts from October, 2017

टेलर - दै सकाळ 17 सप्टेंबर 17

-मंगेश पंचाक्षरी, नासिक.      आम्ही भिंतीच्या आड हळूच दबक्या पावलाने येऊन उभे राहून त्यांचे बोलणे ऐकू लागलो. "आज चोवीस खिसे आणि तीन गळे कापले" एकजण दुसऱ्याला अभिमानाने सांगत होता. दुसऱ्याने त्याच्याही पेक्षा जास्त मजल मारल्याचे फुशारकीने सांगितले. आम्ही योग्य जागी आलो आहोत याची आम्हाला जाणीव झाली. कित्येक दिवसांपासून आम्ही यांचा शोध घेत होतो. आम्ही मनाचा हिय्या करून आत घुसलो. त्या दोघांनीही आमच्याकडे रोखून पाहिले. त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट नाराजी उमटली. आम्हाला हा अनुभव सर्वत्रच आणि नेहमीचा असल्याने बिलकुल 'खेद' वाटला नाही. ते एका प्रसिद्ध टेलरचे दुकान होते. त्यांचेकडे जाण्याशिवाय आम्हाला पर्यायच नव्हता. कारण रेडिमेड कपडे आम्हाला कधीच 'फीट' बसले नाहीत. आमचा देह नेहमीच आडमाप वाढत असल्याने आम्हाला टेलरकडून 'मापं' काढून घेण्याशिवाय गत्यंतर नसते. हल्ली आम्हाला चाळीसचा शर्ट टाईट होतो तर बेचाळीसचा शर्ट लूज होतो. आम्ही 'सव्वाएक्केचाळीस'चा शर्ट वापरला पाहिजे असे एका टेलरने आम्हाला सांगितले. पँटच्या मापांबाबतही आमची हीच तऱ्हा आहे. काही टेलर तर आमचे ...

साम्यवाद

रशियामधील साडेतीनशे वर्षाची रोमानोव राजवट १९१७ मध्ये साम्यवादी विचारांनी उलथवून टाकली असली तरी त्यांच्यात दोन गट होते. बहूमत असंलेला बोल्शेविक आणि अल्पमत असलेला मेन्शेविक. केरेन्स्की यांनी त्झार निकोलस द्वितीय याची घराणेशाही संपवली. मात्र तेथील संसद (ड्युमा) ला राजनिष्ठांचा वेढा होता. केरेन्स्की जर्मनीत गेले आणि त्यांनी तेथे 'दनी' नावाचे मुखपत्र काढले. याआधीच साम्यवाद्यांनी पत्रकबाजी करून, वृत्तपत्र काढून आणि भूमिगत चळवळी उभ्या करून राजा विरोधी वातावरण तापवले होते. 'लेना' या नदीच्या नावावरून लेनिन असे टोपण नाव धरण केलेल्या नेत्याने केरेन्स्कीच्या मर्जीने रशियात सत्ता स्थापन केली. लेनिन स्वतः 'इस्क्रा' म्हणजे ठिणगी या नावाचे मुखपत्र चालवत असत. त्यांच्या 'एप्रिल थिसीस' या लेखाने जनतेला दिलासा मिळाला आणि क्रांतीचा मार्ग सुकर झाला. पुढे केरेन्स्की यांचेशी लेनिन यांचे  मतभेद झाले. मार्क्सच्या विचारांची कम्युनिष्ट राजवट रशियात लागू झाली. लेनिन हा रशियाचा भाग्यविधाता ठरू लागला. रशियाचा राष्ट्रपिताच जणू. लेनिन चा इतका उदो उदो झाला की त्याचे भव्य पुतळे उभारण्यात...

दै सकाळ 23 सप्टेंबर 17 - बेल्ट

मंगेश पंचाक्षरी, नासिक. ( दै सकाळ :- रविवार, 24 सप्टेंबर 17)      शाहरुखचा एक सिनेमा आला होता. त्यात त्याच्या कंबरेच्या बेल्टला जे 'बक्कल' होतं, ते फेमस झालं होतं. आमच्या चिरंजीवानी लगोलग तसा 'बेल्ट' खरेदी केला होता. आपल्या आयुष्यात 'बेल्ट' हा प्रकार वेगवेगळ्या रूपाने येत रहातो. काही लोकं 'मगरी'च्या कातड्यापासून बनवलेला बेल्ट परदेशातून विकत आणतात. आणि इथे आल्यावर प्राण्यांच्या हत्ये विरोधात 'मगरी'चे अश्रू ढाळतात. कंबरपट्ट्याला सध्या जिथे आहे त्याच्यापेक्षा पुढे भोकं पाडायला लागणं हे मनाला फार यातना देणारं काम असतं. हा अनुभव आम्ही साधारणपणे दर दोन महिन्यास घेत असतो. पोलीस खात्यातील लोकांचा 'पट्टा' हे गुन्हेगारांना मारण्यासाठी हत्यार म्हणून वापरायचा असतो आणि फावल्या वेळात तो ठेवणार कुठे म्हणून मग ते तो कंबरेवर बांधून ठेवत असतात.      हल्ली अजून एक 'काळा पट्टा' लोकप्रिय झालेला आहे, तो जुडो, कराटेचा. हल्लीच्या आया आपल्या मुलांना किंवा मुलींना 'पांढरा विशिष्ट पोशाख' आणि त्यावर 'रंगीत पट्टा' अशा वेषात संध्याकाळी क्ल...