इंग्रजी नाव

सध्या खूप नवीन हॉटेल सुरू झालेली आहेत. पण त्यापैकी बहुसंख्य हॉटेल अवघड 'इंग्रजी' नावं देण्यात का धन्यता मानतात ते काही समजत नाही. आमच्या नासिक मध्ये तर इंग्लिश नावाचं पेव च फुटलंय.. भारतीय असल्याचा किती हा न्यूनगंड! बरं ही नावे लक्षात ठेवणे फार कठीण जाते. त्या नावात फार काही अर्थ असतो, असंही नाही.  बरेच वेळा त्या हॉटेलची सेवा आवडत असूनही वेळेवर नाव न आठवल्याने त्या हॉटेलचा संदर्भ दुसर्यास देता येत नाही.

     एका इलेक्ट्रॉनिक वस्तू उत्पादन करणाऱ्या जपानी कंपनीस अनेक क्लिष्ट नावे सुचवण्यात आली. मात्र त्या कंपनीच्या प्रमुखाने नाव छोटे, सोपे असावे असा आग्रह धरला.. जगभरात कम्पनीचे नाव लोकप्रिय व्हावे असे वाटत असेल तर दर्जा सोबत नावही सहज उच्चरता येणारे हवे म्हणून त्या कंपनीने 'सोनी' हे नाव स्वीकारले. एकीकडे परदेशी मोबाईल कंपन्या भारतीय भाषांचे 'फॉन्ट' देऊन व्यावसायिकता दाखवत असताना भारतात व्यवसाय करणाऱ्या छोट्या हॉटेल चालकांचा अनेक उत्तम भारतीय नावं उपलब्ध असूनही  आपण इंग्रजांचे वंशज आहोत असे दाखवण्याचा अट्टाहास का?

© मंगेश पंचाक्षरी, नासिक.

Comments

Popular posts from this blog

२७ ऑक्टोबर तारीख स्वभाव

३० ऑक्टोबर तारीख स्वभाव

२२ ऑक्टोबर तारीख स्वभाव