गुण मेलन भाग ९

 भाग - ९     *गुण -मेलन*


- ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521


नाडीगुणचक्र - ८  गुण


यांस सर्वाधिक ८ पैकी गुण आहेत यावरूनच याचे महत्व लक्षात येते. यावर आरोग्य तपासले जाते. तीन प्रकारच्या नाडी आहेत.


आदी (वात प्रकृती)

मध्य (पित्त प्रवृत्ती)

अंत्य (कफ प्रवृत्ती)


आयुर्वेदात देखील याचा उपयोग केला जातो. एक नाडी दोष असल्यास विवाह टाळला जातो. विशेष करून होणाऱ्या संततीवर याचा फार प्रभाव पडतो असा अनुभव आहे. याशिवाय वधू वर्णाचे साहचर्य, संस्कृतीक जीवन, सांघिक सहकार्य, सामाजिक दायित्व याही बाबींचा यावरून बोध होतो. याबाबतचा तक्ता पंचांगात उपलब्ध आहे.   

 

आपण विवाह संबंधी गुण मेलन बघितले. याखेरीज मंगळीक कुंडली, दोघांच्या कुंडलीतील ग्रहस्थिती, लग्न स्थान, धन स्थान, सप्तम स्थान, लाभ स्थान इत्यादींची मेलन याचाही विचार करावा लागतो. विवाह जुळवताना योग्य आणि तज्ञ ज्योतिषाचा सल्ला घेणे आवश्यक आहे. तथापि गुणमेलन म्हणजे नेमके काय हे समजावे यासाठी *गुण मेलन आणि ज्योतिष्य यावर विश्वास ज्यांचा आहे त्यांच्यासाठी* ही लेखमाला लिहिली आहे.


समाप्त...  


- ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.8087520521.

Comments

Popular posts from this blog

२७ ऑक्टोबर तारीख स्वभाव

३० ऑक्टोबर तारीख स्वभाव

२२ ऑक्टोबर तारीख स्वभाव