गुण मेलन भाग ४
भाग - ४ *गुण -मेलन*
- ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521
तारागुणचक्र - गुण ३
तारा म्हणजेच जातकाचे नक्षत्र. वधू वरांचे नक्षत्र परस्पर नक्षत्रांपासून मोजावीत. त्यांस ९ ने भाग द्यावा. जर बाकी ३,५,७ राहिली तर तारा वाईट समजतात. याचे पुढीलप्रमाणे एकूण नऊ प्रकार आहेत.
१)जन्म - साधारण
२)संपत - चांगले
३)विपत - आपत्तीकारक
४)क्षेम - सुरक्षित, चांगले
५)प्रत्यारी - विरोधी, वाईट
६)साधक - साध्य करणारे, चांगले
७)वध - अत्यंत वाईट
८)मित्र - चांगले
९)अतिमित्र -अत्यंत चांगले
कोणत्याही कार्यासाठी मुहूर्त काढताना देखील गोचर चंद्र नक्षत्राशी याचा मेळ घातला जातो.
क्रमशः ....
(पुढील भागात योनिगुणचक्र )
- ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.8087520521.
Comments
Post a Comment