गुण मेलन भाग ५
भाग - ५ *गुण -मेलन*
- ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521
योनिगुणचक्र - ४ गुण
जातकाच्या योनिवरून त्याचा स्वभाव समजतो. परस्पर स्वभाव जुळण्यासाठी या चक्राचा उपयोग होतो. उदाहरणार्थ एकजण सर्प योनीचा असेल आणि जोडीदार मुंगूस योनीचा असेल तर त्यांच्यात कायम वादविवाद किंवा वैमनस्य राहील. जातकाच्या योनी पुढील प्रमाणे असतात.
अश्व, गज, मेष (मेंढा), सर्प, श्वान, मार्जार (मांजर), मूषक (उंदीर), गौ (गाय), महिषी (म्हैस), व्याघ्र (वाघ), मृग (हरीण), वानर, मुंगूस, सिंह.
सामान्यतः गौ, मृग योनीचे जातक स्वभावाने गरीब असतात, म्हैस योनीचे जातक कामात संथ असु शकतात. श्वान योनीचे जातक अधिक निर्धास्त आणि बेधडक असतात. याप्रमाणे स्वभाव जुळवले जातात आणि त्यांना गुण दिले जातात. वधू - वर परस्पर पूरक असावेत, एकावर अन्याय होऊ नये तसेच त्यांचे स्वभाव जुळावेत हा यामागे हेतू असतो.
क्रमशः ...
(पुढील भागात ग्रहमैत्रीगुण )
- ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.8087520521.
Comments
Post a Comment