२३ ऑक्टोबर तारीख स्वभाव
२३ ऑक्टोबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुमच्यावर बुध आणि शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही कायडप्रेमी आहात. प्रत्येक विषयाची सखोल माहिती असावीयास तुमचा हट्ट असतो. आध्यत्मिकआणि व्यावहारिक आशादोन्ही गोष्टी आवडतात. तुम्ही शांतताप्रिय आहात. प्रवास, कला, संगीत, वाङ्मय यांची आवड असते. पाण्याजवळ भाग्योदय होतो. इतरांची परीक्षा चटकन करण्याचे ज्ञान तुम्हाला असते. भित्र्या लोकांशी तुमचा संबंध येतो. फारशी बडबड केलेली तुम्हाला आवडत नाही. हातचे राखून बोलतात आणि वागतात. तुम्ही चाणाक्ष असून निरीक्षण शक्ती चांगली असते. तुम्हाला अंतर्गत आवाजाची देणगी असते. तुम्ही स्वतः कलाकार असून कला प्रिय देखील आहात. मनाने तुम्ही उदार आणि विचारी असून इतरांची कदर करतात. तुमच्या सानिध्यात आल्यास इतरांना आनंद होतो. तुमचे वागणे आणि बोलणे मोहक आणि आकर्षक आहे. तुम्ही समजूतदार असून विविध खेळांमध्ये यश मिळते. इतरांचे कच्चे दुवे तुम्ही बरोबर हेरतात. स्वतःचे विचार दुसऱ्याला समजून सांगायची तुम्हाला बरीच हौस असते. तुमचे उद्दिष्ट ठाम असते आणि त्या दिशेने तुम्ही मार्गक्रमण करतात. अत्यंत उच्च प्रतीचे कपडे, वाहने, घरे, दाग दागिने आणि सुगंध द्रव्य तुम्ही वापरत असतात. विविध समारंभांमध्ये भाग घेणे आणि समाजात मिसळणे तुम्हाला आवडते. आयुष्याकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन विशाल आणि संयमी आहे. इतरांना मदत करणे तुम्हाला मनापासून आवडते. धर्म आणि तत्वज्ञान तसेच प्रवास याची तुम्हाला आवड आहे. स्वतःच्या व्यवसायात यश मिळते. दुर्बल लोकांवर तुम्ही नियंत्रण मिळवू शकतात.
व्यवसाय:- अकाउंट, बँकिंग, दळणवळण, वाहन विक्री, इलेक्ट्रॉनिक्स, दागिने विक्री, कपडे, कॉस्मेटिक्स.
शुभ दिवस:- बुधवार, शुक्रवार, शनिवार.
शुभ रंग:- पांढरा, निळा, हिरवा.
शुभ रत्न:- पाचू, हिरा, मोती.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
*व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या*
*कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*
Comments
Post a Comment