२६ ऑक्टोबर तारीख स्वभाव

२६ ऑक्टोबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-

     तुमच्यावर शनी, चंद्र आणि शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही भावनाशील असून चंचलता, अस्वस्थपणा नीटनेटके पणा, सौंदर्य यांची आवड असते. मित्र मैत्रिणींचा सहवास तुम्हाला प्रिय असतो. तुमच्यात उत्स्फूर्तपणा असतो. तुम्ही उत्कृष्ट संघटक, महत्वाकांक्षी, क्रियाशील व्यक्ती आहात. तुम्ही सामाजिक कार्यात सहभागी होतात आणि लोक कल्याण साठी झटतात. गूढ विद्या, हिप्नॉटिझम यांची आवड असते. ठराविक चाकोरीतून जाणे तुम्हाला आवडत नाही. जीवनात बऱ्याच वेळा कोणत्याही गोष्टी वेळच्यावेळी होत नाहीत. शिस्त, गांभीर्य, दृढपणा तसेच कर्तव्याची जाणीव तुमच्यात प्रामुख्याने आढळून येते. तुम्ही सखोल विचारांचे आणि स्थिर वृत्तीचे आहात. तुम्ही समतोल विचार करतात आणि कोणत्याही प्रश्नाची दुसरी बाजू समजून घेतात तरी देखील तुमच्याबद्दल इतरांचे गैरसमज होतात. निसर्ग, सौंदर्य, संगीत, फुलं यांची तुम्हाला आवड असते. चार चौघांपेक्षा तुम्ही अधिक धोरणी आणि बुद्धिमान आहात. तुम्ही महत्त्वाकांक्षी असून कार्य मग्न असतात. तुम्ही कार्यक्षम आणि अधिकार गाजवणारे आहात. तुम्हाला तुमच्यापेक्षा दुर्बल लोकांबद्दल आपुलकी आणि आदर असतो. तुमचे व्यक्तिमत्व प्रसन्न असल्यामुळे तुम्हाला भेटून इतरांना आनंद होतो. तुम्ही एक उत्तम व्यवस्थापक असतात. व्यवहारातील सर्व गोष्टी तुम्ही सुलभतेने हाताळू शकतात. आर्थिक बाबतीत तुमचे नियोजन उत्तम असते. इतरांच्या समस्या आणि दुःख तुम्ही चांगल्या प्रकारे सोडवू शकतात. तुम्ही इतरांसाठी एक आदर्श असतात. आयुष्यात अनेक बाबतीत तुम्हाला विलंब सहन करावा लागतो. ८ हा अंक लाभदायक ठरल्यास अकस्मात खूप पैसा मिळू शकतो.

व्यवसाय:-  वैद्यकीय शास्त्र, गणिती,  कंपनी सेक्रेटरी, संशोधन, वैचारिक लेखन, बँकिंग, प्रयोगशाळा उपकरणे, व्यवस्थापक व उद्योग क्षेत्र, बौद्धिक क्षेत्र.

शुभ दिवस:- बुधवार, गुरुवार, शुक्रवार.

शुभ रंग:- राखाडी, काळा, जांभळा, गडद निळा.

शुभ रत्न:- इंद्रनील, काळा मोती, हिरा.

(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)

*व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या*

*कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*

Comments

Popular posts from this blog

२७ ऑक्टोबर तारीख स्वभाव

३० ऑक्टोबर तारीख स्वभाव

२२ ऑक्टोबर तारीख स्वभाव