२४ ऑक्टोबर तारीख स्वभाव
२४ ऑक्टोबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुमच्यावर शुक्र ग्रहाचा प्रभाव आहे. तुमच्या भरपूर ओळखी असतात आणि समाजात मोठ्या प्रमाणावर येणे जाणे असते. श्रीमंत व्यक्तीशी विवाह होतो आणि त्यानंतर भाग्योदय होतो. खाजगी जीवन आणि सामाजिक जीवन यात तुम्ही अंतर ठेवतात. स्वतःकडे उत्तम गुण असतात मात्र ते दाखवण्याची संधी मिळणे महत्वाचे असते. बुद्धिमत्ता आणि समरणशक्ती उत्तम असते. इतरांना न दुखावण्याचा स्वभाव असतो. तुम्ही स्वतः कलाकार असून कलाप्रिय आहात. तुमच्यामध्ये व्यापारी वृत्ती, अंतर्गत आवाजाची देणगी आणि व्यवहारिकता आहे. तुमचे व्यक्तिमत्व प्रसन्न आहे, मोहक आणि आकर्षक आहे. लोकांना तुमच्याबद्दल आकर्षण वाटते. रूढी आणि परंपरा याबद्दलच्या तुमच्या कल्पना समाजापेक्षा वेगळ्या असतात. तुम्हाला समजून घेणे इतरांना कठीण जाते. स्वतःचे निर्णय स्वतःच घेण्याकडे तुमचा कल असतो. तुमचे उद्दिष्ट काय आहे यावर लक्ष ठेवून ते साध्य करण्यासाठी तुम्ही सतत प्रयत्न करत असतात. तुमचे वक्तृत्व चांगले असते. जीवनात तुम्हाला मानसन्मान मिळतो. विविध समारंभांमध्ये भाग घेणे तुम्हाला आवडते. तुम्ही एक उत्तम सहकारी असतात. मित्रांना मदत करण्यात तुम्हाला सात्विक आनंद मिळतो. धर्म आणि तत्वज्ञाने या विषयांची आवड उत्पन्न होते. तुमचे आयुष्य आरामदायक आणि सुखलोलूप असते. तुम्ही उच्च प्रतीचे कपडे आणि दागिने वापरतात. स्वतःच्या प्रेमासंबंधींबाबत तुम्ही संशयी असतात. प्रेमात तुम्ही सावधपणे पावले टाकतात. तुमच्यात अहंगंड असून कधीकधी तुम्ही स्वतःची मते इतरांवर लादतात.
व्यवसाय:- बेकरी, हॉटेल, संगीतकार, जवाहर, आर्किटेक्ट, गृह सजावट, प्रयोगशाळा उपकरणे, मेडिकल स्टोअर्स, अकाउंट, पॅथॉलॉजी.
शुभ दिवस:- सोमवार, मंगळवार, गुरुवार, शुक्रवार.
शुभ रंग:- निळा आणि गुलाबी.
शुभ रत्न:- पाचु, मोती, हिरा.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
*व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या*
*कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*
Comments
Post a Comment