२८ ऑक्टोबर तारीख स्वभाव

२८ ऑक्टोबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-

     तुमच्यावर चंद्र, शनी आणि शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही स्वप्नाळू मनाचे आहात. शैक्षणिक संस्था, दवाखाने, सामाजिक संस्था यांच्याशी तुमचा संबंध येतो. तुमच्या भावना तुम्हाला सहजपणे व्यक्त करता येतं नाहीत. त्यामुळे गैरसमज होऊ शकतो. वैयक्तिक जीवनात तुम्हाला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. व्यवसायात चांगलेयश मिळते मात्र तुम्ही अति संवेदनशील असल्याने किरकोळ बाबींमुळे दुखावले जातात. वृत्ती संशोधक असते. स्वभाव तापट आणि हेकट असल्याने भांडणे होऊ शकतात. प्रेमप्रकरणात घाई करू नये. तुम्हाला आपोआप अधिकार आणि प्रतिष्ठा लाभते. तुम्हाला इतरांची लुडबुड सहन होत नाही. तुम्ही जीवनात उच्च तेच निवडतात. फार सखोल अभ्यास 'न' करता देखील तुम्ही इतरांवर प्रभाव पाडू शकतात. आई-वडील पत्नी इतर नातेवाईक यांच्यापासून तुम्हाला लाभ होतात. तुमची स्मरणशक्ती दांडगी आहे. तुमचा स्वभाव धडपडा आहे. तुमच्या वृत्ती स्वतंत्र असून तुम्ही एकाच गोष्टीत फार काळ रमत नाहीत. सतत बदल करण्याकडे तुमचा ओढा असतो. आपला आयुष्यात काहीतरी सणसणाटी असावे असे तुम्हाला नेहमी वाटते. तुमच्या आयुष्यात बरेच चढउतार होतात. तुम्ही सतत कार्यमग्न असतात. तुम्हाला कला आणि प्रवास यांची आवड आहे. तुम्ही एक उत्तम सल्लागार आहात. प्रेम सहानुभूती आणि आदर हे तुमचे वैशिष्ट्य आहेत. उच्च दर्जाचे सुगंधित द्रव्य, दागिने, कपडे, वाहने, घरे यांच्या तुम्हाला आकर्षण असते. आर्थिक बाबतीत तुम्ही नशीबवान आहात मात्र तुमचा स्वभाव खर्चिक आहे. तुम्हाला प्राणी प्रिय असतात. तुम्ही अत्यंत बुद्धिमान, शास्त्राची आवड असणारे आणि व्यापारी वृत्तीचे आहात. हातातील कार्य सिद्धीस नेण्यासाठी तुम्ही पूर्वनियोजन करतात. तुम्हाला गूढ विद्यांची आवड आहे. तुमचा दृष्टिकोन विशाल असून तुमच्यामध्ये संयम आहे. तुमची इच्छा शक्ती दांडगी आहे. प्रत्येक विषयाचा तुम्ही सखोल अभ्यास करतात. तुमचे व्यक्तिमत्व प्रसन्न आणि उत्साही आहे. वृत्ती संशोधक आहे. जीवनाकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन आशादायक आहे. तुम्हाला उत्तम भाषा चातुर्य आहे. तुमची विचारसरणी तर्कशुद्ध आणि विश्लेषण करण्याची वृत्ती सूक्ष्म आहे. 

व्यवसाय:-  बौद्धिक, व्यवसाय, बँकिंग, सेल्स मॅनेजर, आयात निर्यात, पुस्तक विक्रेता, वृत्तपत्र व्यवसाय, इंटरियर डेकोरेटर, वकील, डिपार्टमेंट स्टोअर्स, डॉक्टर, केमिस्ट, तंत्रज्ञ.

शुभ दिवस:- रविवार, गुरुवार आणि शुक्रवार.

शुभ रंग:- पिवळा, सोनेरी, नारंगी आणि निळा.

शुभ रत्न:- माणिक, पाचू, मोती.

(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)

*व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या*

*कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*

Comments

Popular posts from this blog

२७ ऑक्टोबर तारीख स्वभाव

३० ऑक्टोबर तारीख स्वभाव

२२ ऑक्टोबर तारीख स्वभाव