१ नोव्हेंबर तारीख स्वभाव
१ नोव्हेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुमच्यावर रवी आणि मंगळव या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमचा स्वभाव महत्वाकांक्षी असून तुम्ही अनेक गोष्टींमध्ये रस घेतात. तुम्ही विचाराने स्वतंत्र आहात. तुमचा सतत बदल करण्याकडे ओढा असतो. एकाच गोष्टी तुम्ही फार काळ रमत नाहीत. आपल्या जीवनात काहीतरी सनसनाटी असावे असे तुम्हाला वाटते. तुम्ही सतत कार्यमग्न असतात. तुमचे वक्तृत्व उत्तम असते. कलेबद्दल तुम्हाला आकर्षण असते. तुमच्या मित्रांमध्ये तसेच व्यवसायामध्ये अनेक बदल होतात. तुम्ही संशोधक वृत्तीचे आहात. तुमची इच्छाशक्ती दांडगी असून जीवनात तुम्ही आशावादी असतात. इतरांचा स्वभाव तुम्ही सहज ओळखू शकतात. तुम्ही एक सभ्य व्यक्ती असतात आणि तुमचा दृष्टिकोन विशाल असतो. तुम्ही परंपरा आणि रूढी मानत नाहीत. तुमची विचारसरणी तर्कशुद्ध आणि दृष्टिकोन विश्लेषण करण्याचा असतो. इतरांना सतत विरोध करण्यामुळे तुम्हाला गुप्त शत्रू निर्माण होतात. तुमच्याकडे नाजूकपणा सहसा नसतो. तुम्ही अति स्पष्ट बोलतात. तुमचा स्वभाव काहीसा शिघ्रकोपी आहे. तुम्ही इतरांवर दया करतात मात्र त्यातून तुम्हाला सुप्त आनंद मिळतो. कोणत्याही अडचणीला तुम्ही ठामपणे तोंड देऊ शकतात. तुम्हाला जीवनात सर्व सुखे प्राप्त होतात.
व्यवसाय:- बँकिंग, विक्री व्यवसाय, पुस्तक विक्रेता, आयात- निर्यात, वृत्तपत्र व्यवसाय, इंटरियर डेकोरेटर, प्रोग्रॅम डायरेक्टर, टीव्ही सिरीयल, डॉक्टर, केमिस्ट, धातू संबंधित व्यवसाय.
शुभ दिवस:- रविवार, सोमवार, गुरुवार.
शुभ रंग:- सोनेरी, पिवळा, नारंगी किंवा जांभळा.
शुभ रत्न:- माणिक आणि पाचू.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
*व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या*
*कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*
Comments
Post a Comment