२१ ऑक्टोबर तारीख स्वभाव

२१ ऑक्टोबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-

     तुमच्यावर शुक्र आणि गुरु या ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही प्रेमळ असून संसार, पत्नी आणि लहान मुलांबद्दल विशेष आस्था असते. उत्साह दांडगा असून प्रवासाची आवड असते. आयुष्यात उशिराने प्रतिष्ठा लाभते. तुमच्याभाववती एकप्रकारचे वलय असून लोकांना आकर्षित केले जाते. तुमचा ओढा सुखासीन जीवनाकडे असतो. तुम्हाला आयुष्यात सहजपणे मान- सन्मान मिळतात. इतरांकरिता तुम्ही स्वार्थत्याग करतात मात्र त्यातून तुम्हाला अपेक्षाभंग मिळतो. तुमच्याशब्दात आणि कृतीत ठामपणा असतो. वायफळ बडबड तुम्हाला आवडत नाही. विवाहानंतर भाग्योदय होतो. तुम्ही अत्यंत महत्त्वाकांक्षी असून मान सन्मान आणि प्रतिष्ठा तुम्हाला प्रिय आहे. तुमचा आत्मविश्वास दांडगा आहे. धर्माचा तुम्ही डोळसपणे अभ्यास करतात. तुम्ही न्यायप्रेमी आणि इतरांच्या साठी कष्ट घेणारे आहात. तुम्हाला मोठ्याने बोलण्याची सवय असते. तुमच्यात रुबाबदारपणा, काटेकोरपणे आणि व्यवस्थितपणा आहे. दुर्बल लोकांना तुम्ही नेहमीच मदत करतात. तुमच्यामध्ये अनेक कौशल्य आहेत. क्रीडा प्रकारांची तुम्हाला आवड आहे. हाती घेतलेल्या कार्यासाठी तुम्ही उत्तम पूर्वनियोजन करतात. तुमचा दृष्टिकोन विशाल आहे आणि जीवनाकडे तुम्ही आशादायकपणे बघतात. स्वतःच्या प्रेमसंबंधांंबाबत तुम्ही आशादायी आणि संयमी असतात. प्रेमात तुम्ही सावधपणे पाऊल टाकतात. तुम्ही एक उत्तम सल्लागार असून आयुष्यात येणाऱ्या समस्यांवर तुम्ही यशस्वीपणे मार्ग काढू शकतात. भिन्नलिंगी व्यक्तींमध्ये तुम्ही लोकप्रिय असतात. वडिलोपार्जित समपट्टीत तुम्हाला वाटा मिळतो. इतरांना तुम्हीयोग्य सल्ला देतात. तुमच्यात आध्यत्मिक शक्ती असते.  

व्यवसाय:-  राजकीय क्षेत्र, मंत्री, न्यायाधीश, सचिव, शैक्षणिक क्षेत्र, वैद्यकीय क्षेत्र.

शुभ दिवस:- मंगळवार, गुरुवार, शुक्रवार.

शुभ रंग:- पिवळा, जांभळा, हिरवा.

शुभ रत्न:- पुष्कराज, अमेठीस्ट, लसण्या.

(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)

*व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या*

*कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*

Comments

Popular posts from this blog

२७ ऑक्टोबर तारीख स्वभाव

३० ऑक्टोबर तारीख स्वभाव

२२ ऑक्टोबर तारीख स्वभाव