१२ नोव्हेंबर तारीख स्वभाव
१२ नोव्हेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुमच्यावर मंगळ आणि गुरू या दोन ग्रहांचा प्रभाव आहे. तुमचे जीवन सुखासीन असते अन भिन्न लिंगी व्यक्तींकडे तुमचा ओढ असतो. इतरांचे किरकोळ दोष सुद्धा तुम्ही सहज काढू शकतात. तुम्हाला अधिकार आणि मान सन्मान प्राप्त होतात. इतरांकरिता तुम्ही स्वार्थत्याग करतात. तुम्ही अत्यंत महत्त्वाकांक्षी असून आयुष्यात सतत पुढे जाण्याचा विचार करत असतात. तुमच्याकडे ज्ञान आहे मात्र त्याचा अहंकार टाळला पाहिजे. तुमचा कर्मकांडावर विश्वास नसतो. तुम्ही नेहमी योग्य व्यक्तीला मदत करतात. तुम्ही न्याय प्रेमी असून तुम्हाला शुद्ध प्रेमाची आवड आहे. इतरांच्या प्रगतीसाठी तुम्ही कष्ट करतात आणि अडचणीत असलेल्या लोकांना मदत करतात. तुम्ही उत्साही आणि क्रियाशील आहात परंतु शीघ्रकोपी आहात. इतरांवर तुम्ही वर्चस्व गाजवतात. एखाद्या मोठ्या कारखान्याचे तुम्ही उत्कृष्टपणे संचालन करू शकतात. तुमचा स्वतंत्र बाणा आहे आणि तुमची जबाबदारी तुम्ही चोख पार पाडतात. तुमच्या कामात ढवळाढवळ केलेली तुम्हाला आवडत नाही. तुम्ही स्वतःचे डोके शांत ठेवल्यास कोणतीही गोष्ट मिळवणे तुम्हाला अशक्य नाही. तुम्ही दयावान आणि नीतिमान आहात. तुम्हाला मोठ्याने बोलण्याची सवय असते. तुमच्यामध्ये पुरेपूर आत्मविश्वास आहे. तुम्ही व्यवस्थित आणि दिमाखदार आहात. तुमच्या बोलण्यामध्ये एक प्रकारचा मोकळेपणा असतो. तुम्हाला अनेक खेळांची आवड असते. तुम्हाला उत्तम विनोद बुद्धी लाभलेली आहे. तुम्ही हट्टीपणा आणि अहंकार टाळला पाहिजे. भविष्यात घडणाऱ्या घटनांची तुम्हाला आधीच जाणीव होते. तुम्ही अतिसंवेदनशील आहात त्यामुळे तुमचे वागणे एकांती आणि गूढ असते.
व्यवसाय:- न्यायाधीश, सचिव, सामाजिक कार्यकर्ता, धार्मिक गुरु, शिक्षक, कारखानदार, सावकार, जाहिरात वितरक, अभिनेता, मॅनेजिंग डायरेक्टर.
शुभ दिवस:- मंगळवार, गुरुवार आणि शुक्रवार.
शुभ रंग:- अंजिरी, पिवळा आणि जांभळा.
शुभ रत्न:- पुष्कराज, अमेठीस्ट आणि लसण्या.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
*व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या*
*कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*
Comments
Post a Comment