१७ नोव्हेंबर तारीख स्वभाव

१७ नोव्हेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-

       तुमच्यावर शनी आणि मंगळ या ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही इतरांपेक्षा अधिक धोरणी आणि मुत्सद्दी आहात. तुम्ही उत्कृष्ट संघटक आणि विचारी आहात. स्वाभिमानी आहात. गूढ विद्या, जादूटोना याची आवड असते. इतरांना तुम्ही सहज माफ करतात मात्र कधीकधी छोटी बाब लावून धरतात. वागणे आक्रमक असते. तुम्ही संमिश्र गुणांचे आहात. शांतता आणि एकांत तुम्हाला आवडतो. शास्त्रीय संगीताची आवड असते. शिस्त, टापटीप, नियमितपणा आवडतो. जीवनाचा खोलवर विचार करून भविष्याचे निर्णय विचारपूर्वक घेतात. तुम्ही धोरणी आणि मुत्सद्दी आहात. धाडसी, आक्रमक आणि तत्पर आहात. तुमचाउद्देश चांगला असतो मात्र मुद्देसूद बोलता येत नाही. खेळांची आणि व्यायामाची आवड असते. तुम्ही समतोल विचारांचे, कडक शिस्तीचे, निश्चयी, कर्तव्यतत्पर आणि कार्यक्षम आहात. तुम्ही संशयी असू शकतात आणि तुमच्या बाबत बरेच गैरसमज असतात. मनातून एकटे असतात. मैत्रीला जगणारे आहात मात्र स्वभाव तापट आहे. जीवनात अडचणी आणि विलंब याचा अनुभव येतो. इतरांना वेळेला मदत केली तरी तुमच्या वेळी इतर लोक येत नाहीत त्यामुळे कधीकधी जीवनात नैराश्य येते. संशोधनात तुम्हाला रस असतो. ज्ञान मिळवण्याची आवड असते. व्यक्तिमत्व आकर्षक असते खोटेपणा आवडत नाही.        

व्यवसाय:-  इंजिनिअर, राजकारण, लाकूड, कोळसा, भौतिक शास्त्र, गणित, संशोधन, लेखन, रेल्वे, परिवहन.

शुभ दिवस:- बुधवार, गुरुवार, शनिवार.

शुभ रंग:- राखाडी, काळा, निळा.

शुभ रत्न:- इंद्रनील, मोती, हिरा.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)

*व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या*

*कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*

Comments

Popular posts from this blog

२७ ऑक्टोबर तारीख स्वभाव

३० ऑक्टोबर तारीख स्वभाव

२२ ऑक्टोबर तारीख स्वभाव