योगासन
'सलमान खान' किंवा 'जॉन अब्राहम' चा सिनेमा पाहून आलो की दुसऱ्या दिवशी पासून आम्ही व्यायाम सुरू करतो. त्यासाठी आम्ही लगेच 'जीम' मध्ये जाऊन एक वर्षांचे पैसे भरून टाकतो. मग 'ट्रॅक सूट, स्पोर्ट शूज, कॅलरी मोजणारे घड्याळ' असा जामानिमा करून आम्ही आरशासमोर डंबेल्स फिरवायला सुरुवात करतो. या काळात घरात काजू, बदाम असा खुराक असतो. हे वेड तब्बल 'सात ते आठ' दिवस टिकतं. नंतर मग सकाळी उठायला उशीर झाल्यानें त्यात खंड पडतो. सुटलेलं पोट एक 'नॅनो मीटर' ही कमी होत नाही आणि वजन काटा रोज वाढत्या बाजूनेच दिसल्याने आमचा भ्रमनिरास होतो. कोणीतरी आम्हाला सुचवतो 'वॉक' केल्याशिवाय पोट कमी होणार नाही, कोणती म्हणतं 'सायकलिंग' करा, कोणी सांगतं 'रात्री जेऊ नका' तर कोणी म्हणतं 'भरपूर खा, काही होत नाही' . विशेष म्हणजे असे सल्ले देणाऱ्यांची पोटं चांगलीच 'सुटलेली' असतात. महिनाभर लोकांनी सांगितलेलं सर्व काही आम्ही करून बघतो. वजन कमी झाल्यासारखं वाटायला लागतं. तेव्हड्यात एखादा मित्र म्हणतो "बारीक झाल्यासारखा वाटतोस रे तू?" त्य...