Posts

Showing posts from August, 2020

गुण मेलन भाग ९

 भाग - ९     *गुण -मेलन* - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521 नाडीगुणचक्र - ८  गुण यांस सर्वाधिक ८ पैकी गुण आहेत यावरूनच याचे महत्व लक्षात येते. यावर आरोग्य तपासले जाते. तीन प्रकारच्या नाडी आहेत. आदी (वात प्रकृती) मध्य (पित्त प्रवृत्ती) अंत्य (कफ प्रवृत्ती) आयुर्वेदात देखील याचा उपयोग केला जातो. एक नाडी दोष असल्यास विवाह टाळला जातो. विशेष करून होणाऱ्या संततीवर याचा फार प्रभाव पडतो असा अनुभव आहे. याशिवाय वधू वर्णाचे साहचर्य, संस्कृतीक जीवन, सांघिक सहकार्य, सामाजिक दायित्व याही बाबींचा यावरून बोध होतो. याबाबतचा तक्ता पंचांगात उपलब्ध आहे.      आपण विवाह संबंधी गुण मेलन बघितले. याखेरीज मंगळीक कुंडली, दोघांच्या कुंडलीतील ग्रहस्थिती, लग्न स्थान, धन स्थान, सप्तम स्थान, लाभ स्थान इत्यादींची मेलन याचाही विचार करावा लागतो. विवाह जुळवताना योग्य आणि तज्ञ ज्योतिषाचा सल्ला घेणे आवश्यक आहे. तथापि गुणमेलन म्हणजे नेमके काय हे समजावे यासाठी *गुण मेलन आणि ज्योतिष्य यावर विश्वास ज्यांचा आहे त्यांच्यासाठी* ही लेखमाला लिहिली आहे. समाप्त...   - ज्योति...

गुण मेलन भाग ८

 भाग - ८     *गुण -मेलन* - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521 राशिकूटगुणचक्र - ७  गुण एकूण बारा राशी आहेत. यात नवपंचम, द्विद्वारदश, षडअष्टक इत्यादी योग होतात. यातील काही योग वर्ज्य आहेत. त्यास ७ पैकी गुण आहेत. जातकाच्या राशीच्या मागील राशी, पुढील राशी, पाचवी राशी, सहावी राशी, आठवी राशी, नववी राशी वर्ज्य आहेत. अर्थात यात काही योग शुभ किंवा प्रीतीयुक्त असल्याने चालू ते शकतात. यातून परस्पर प्रेम समजते. एकमेकांप्रति आदर समजतो. 'प्रीती षड-अष्टक' असल्यास वधू वर भरपूर भांडतात मात्र त्यांच्यात खूप प्रेमही असते. याबाबतचा तक्ता पंचांगात उपलब्ध आहे.      क्रमशः..... (पुढील भागात नाडीगुणचक्र ) - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.8087520521.

गुण मेलन भाग ७

 भाग - ७     *गुण -मेलन* - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521 गणगुणचक्र - ६  गुण एकूण तीन गण आहेत याची आपल्याला कल्पना आहेच.  देवगण मनुष्यगण राक्षसगण यावरून जातकाचा गुणस्तर लक्षात येतो. जातक एकमेकांना योग्य आहेत की नाही ते यावरून समजते. यास सहा पैकी गुण आहेत. वधू वरांचे भविष्य, त्यांचे स्वभाव गुण, त्यांच्यातील मधुर संबंध, आयुष्यातील संगीत, दृढ विश्वास, एकमेकांबद्दलची ओढ याचा यातून बोध होतो.  देव - देव, मनुष्य - मनुष्य, राक्षस -राक्षस याप्रमाणे गण जुळल्यास ६ मार्क्स दिले जातात. बाकी तक्ता पंचांगात उपलब्ध आहे.      क्रमशः.... (पुढील भागात राशिकूटगुणचक्र ) - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.8087520521.

गुण मेलन भाग ६

 भाग - ६     *गुण -मेलन* - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521 ग्रहमैत्रीगुणचक्र - ५ गुण सुसंगतता बघण्यासाठी याचा उपयोग होतो. राशीस्वामी नुसार यात गुण दिले जातात. राशी स्वामी पुढीलप्रमाणे आहेत. मेष - मंगळ वृषभ - शुक्र मिथुन - बुध कर्क -चंद्र सिंह - रवी कन्या - बुध तुळ - शुक्र वृश्चिक - मंगळ धनू - गुरू मकर - शनी कुंभ - शनी मीन - गुरू प्रत्येक ग्रहाला स्वभाव आहेत. त्यानुसार जातकाचे परस्पर संबध ठरतात.  क्रमशः..... (पुढील भागात गणगुणचक्र ) - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.8087520521.

गुण मेलन भाग ५

 भाग - ५      *गुण -मेलन* - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521 योनिगुणचक्र - ४ गुण जातकाच्या योनिवरून त्याचा स्वभाव समजतो. परस्पर स्वभाव जुळण्यासाठी या चक्राचा उपयोग होतो. उदाहरणार्थ एकजण सर्प योनीचा असेल आणि जोडीदार मुंगूस योनीचा असेल तर त्यांच्यात कायम वादविवाद किंवा वैमनस्य राहील. जातकाच्या योनी पुढील प्रमाणे असतात. अश्व, गज, मेष (मेंढा), सर्प, श्वान, मार्जार (मांजर), मूषक (उंदीर), गौ (गाय), महिषी (म्हैस), व्याघ्र (वाघ), मृग (हरीण), वानर, मुंगूस, सिंह. सामान्यतः गौ, मृग योनीचे जातक स्वभावाने गरीब असतात, म्हैस योनीचे जातक कामात संथ असु शकतात. श्वान योनीचे जातक अधिक निर्धास्त आणि बेधडक असतात. याप्रमाणे स्वभाव जुळवले जातात आणि त्यांना गुण दिले जातात. वधू - वर परस्पर पूरक असावेत, एकावर अन्याय होऊ नये तसेच त्यांचे स्वभाव जुळावेत हा यामागे हेतू असतो. क्रमशः ... (पुढील भागात ग्रहमैत्रीगुण ) - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.8087520521.

गुण मेलन भाग ४

 भाग - ४        *गुण -मेलन* - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521 तारागुणचक्र - गुण ३  तारा म्हणजेच जातकाचे नक्षत्र. वधू वरांचे नक्षत्र परस्पर नक्षत्रांपासून मोजावीत. त्यांस ९ ने भाग  द्यावा. जर बाकी ३,५,७ राहिली तर तारा वाईट समजतात. याचे पुढीलप्रमाणे एकूण नऊ प्रकार आहेत.  १)जन्म - साधारण २)संपत - चांगले ३)विपत - आपत्तीकारक ४)क्षेम - सुरक्षित, चांगले ५)प्रत्यारी - विरोधी, वाईट ६)साधक - साध्य करणारे, चांगले ७)वध - अत्यंत वाईट ८)मित्र - चांगले ९)अतिमित्र -अत्यंत चांगले कोणत्याही कार्यासाठी मुहूर्त काढताना देखील गोचर चंद्र नक्षत्राशी याचा मेळ घातला जातो.   क्रमशः .... (पुढील भागात योनिगुणचक्र ) - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.8087520521.

गुण मेलन भाग ३

 भाग - ३            *गुण -मेलन* - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521 वश्यगुणचक्र - गुण (मार्क्स) = २ एकूण बारा राशी आहेत. त्यात काही जलचर, काही वनचर, काही कीटक, मानव तर काही चतुष्पाद आहेत.  *जलचर राशी* कर्क मीन मकर *वनचर राशी* सिंह   *कीटक राशी* वृश्चिक *मानव राशी* मिथुन धनू कुंभ कन्या तुळ *चतुष्पाद राशी* मेष वृषभ वर चतुष्पाद किंवा कीटक राशीचा असेल आणि वधू पण त्याच विषय गुणांची असेल तर २ गुण मिळतात. याचे कोष्टक पंचागात उपलब्ध असते. या वरून कोण कोणावर वर्चस्व गाजवणारी ते समजते. परस्पर विश्वास, धार्मिकता, शांततामय जीवन, शिक्षण, एकमेकांना ओळखणे यासाठी या चक्राचा वापर केला जातो. क्रमशः .... (पुढील भागात तारागुण चक्र ) - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.8087520521.

गुण मेलन भाग २

 भाग - २          *गुण -मेलन* - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521 वर्ण गुण चक्र (१ गुण) वर -  'विप्र' असल्यास वधू 'विप्र, क्षत्रिय, वैश्य, क्षुद्र' यांपैकी कोणीही असल्यास १ गुण मिळतो.          वर - क्षत्रिय असल्यास वधू 'क्षत्रिय, वैश्य, क्षुद्र' यांपैकी कोणत्याही वर्णाची असल्यास १ गुण मिळतो. वर- वैश्य असल्यास वधू वैश्य किंवा क्षुद्र वर्णाची असल्यास १ गुण मिळतो. वर क्षुद्र वर्णाचा असल्यास वधू क्षुद्र वर्णाची असल्यास १ गुण मिळतो. क्रमशः.... (पुढील भागात वश्यगुणचक्र) - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.8087520521.

गुण मेलन भाग १

 भाग - १         गुण मेलन  - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521 विवाह गुणमेलन म्हणजे काय?  "छत्तीस गुण जुळणे" हा शब्दप्रयोग आपण अनेकदा ऐकला असेल. नेमके कोणते छत्तीस गुण असतात? त्यात काय बघितले जाते? छत्तीस गुण जुळवताना आठ मुद्दे बघितले जातात. त्यांना चढत्या क्रमाने गुण असतात. १) वर्णगुण - १ मार्क २) वश्यगुण - २ मार्क्स ३) तारा गुण - ३ मार्क्स ४) योनी गुण - ४ मार्क्स ५) ग्रहमैत्री - ५ मार्क्स ६) गण - ६ मार्क्स ७) राशीकूट/भकुट - ७ मार्क्स ८) नाडी - ८ मार्क्स वरील गुणांची (मार्क्सची) बेरीज छत्तीस येते. यांपैकी वधू वरांचे किती गुण जुळतात ते गुण-मेलन मध्ये बघीतले जाते. किमान अठरा गुण जुळणे आवश्यक आहे. वैवाहिक जीवनांत कोणत्या गुणांवर काय अवलंबून असते ते आपण पुढे बघणार आहोत. आता तुम्ही स्वतःच गुण मेलन करू शकाल. क्रमशः.... (पुढील भागात पहिला गुण - वर्णगुण) - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521